China Defense Budget : चीनने (China) आपली लष्करी ताकद (Military) आणखी मजबूत करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे. चीनने पुन्हा एकदा संरक्षण बजेटमध्ये (China Defense Budget) मोठी वाढ केली आहे. संरक्षणासाठी चीनने २४९ अरब डॉलर जाहीर केले आहेत. ही रक्कम मागील वर्षीच्या बजेटपेक्षा ७.२ टक्के जास्त आहे. चीनने आपल्या लक्षणीय वाढ करण्याचे हे सलग आठवे वर्ष आहे.
मुंबईला गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा कट…ठाकरे गटाने सरकारला घेरलं, विधानपरिषदेत मोठा गोंधळ
चीनचे पंतप्रधानांना सादर केलेल्या मसुद्याच्या अर्थसंकल्पात यावर्षी चीनचे संरक्षण बजेट १.७ ट्रिलियन युआन निश्चित करण्यात आले आहे. चीन आपल्या सैन्याची ताकद वाढवण्यासाठी आणि लष्करी शस्त्रे वाढवण्यासाठी खूप पैसा खर्च करत आहे. शांतता आणि सार्वभौमत्वासाठी ताकद आवश्यक असल्याचे चीनने मंगळवारी म्हटले.
चीनची ही वाढती लष्करी ताकद भारतासह शेजारील देशांसाठी धोका ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
चीन सीमा वाढवणार..
चीनने पूर्व लडाख, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये आधीपासूनच आपल्या लष्करी पायाभूत सुविधा मजबूत केल्यात. २०२० मध्ये झालेल्या गलवान संघर्षानंतर चीनने सीमेवर हवाई पट्ट्या, क्षेपणास्त्र प्रणाली आणि मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलंय. त्याच वेळी, संरक्षण बजेटमध्ये वाढ झाल्यानंतर, चीन आता नियंत्रण रेषेवर (LAC) आपल्या हालचाली वाढवू शकतो. यामुळे भारतालाही आपली सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करावी लागेल.
हिंद महासागर क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढणार
चीन आपले नौदल मजबूत करण्यावरही भर देत आहेत. चीन नवीन युद्धनौका, पाणबुड्या आणि विमानवाहू जहाजे विकसित करत आहे. चीन हा देश श्रीलंका, पाकिस्तान (ग्वादर बंदर) आणि म्यानमारमध्ये आपले नौदल तळ विकसित करत आहे. अशा परिस्थितीत, हिंदी महासागरातील चीनच्या कारवाया भारतासाठी मोठी आव्हान बनू शकतात. यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेला आणि व्यापारी मार्गांना धोका वाढू शकतो.
पाकिस्तानशी संबंध सुधारणे भारतासाठी धोक्याचे…
चीन आणि पाकिस्तानमधील संबंधही सुधारत आहेत. चीन पाकिस्तानला सतत आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने पुरवत आहे. अलिकडेच पाकिस्तानला JF-17 लढाऊ विमाने, HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली आणि आधुनिक ड्रोन चीनने दिले. त्यामुळं भारताला धोका निर्माण होऊ शकतो. चीन आणि पाकिस्तान दोघेही भारतासाठी आव्हाने निर्माण करू शकतात.
चीनची वाढती लष्करी ताकद आणि त्याच्या संरक्षण बजेटमध्ये झालेली वाढ यामुळं भारतासमोर अनेक आव्हाने निर्माण झालीत. दरम्यान, चीनची आक्रमक लष्करी धोरणे आणि पाकिस्तानसोबतेच वाढते सहकार्य पाहात भारताला संरक्षण बजेट वाढवण्याची गरज आहे. सध्या भारत संरक्षणावर जीडीपीच्या फक्त १.९ टक्के खर्च करतो, तर तज्ञांचे मत आहे की ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढवलं पाहिजे. याव्यतिरिक्त, याशिवाय भारताला आपल्या लष्करी आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला गती द्यावी लागेल.