Gas Cylender Price Rise : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना चटका देणारी बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या पहिल्याचं दिवशी गॅस सिलेंडरचे भाव वाढले असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. (Cylender ) वाढलेल्या या सिलेंडरच्या किमतींमुळे व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 1900 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.
Box Collection: थलपथी विजयच्या ‘GOAT’ची बंपर ओपनिंग; मोडला रजनीकांतच्या ‘जेलर’चा विक्रम
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासून आतापर्यंत घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नसला तरी व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. व्यवसायिक सिलेंडरच्या दरात ऑक्टोबर महिन्यातही वाढ झाली आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मार्च महिन्यात दरामध्ये 100 रुपयांची कपात करण्याच आली होती. तर 30 ऑगस्ट 2023 रोजी सरकारच्या आदेशानुसार तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरचे दर 80.50 रुपये आहे. तर चेन्नईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 818.50 रुपये आहे.