Download App

न्यायमूर्ती बेला त्रिवेदींना फेयरवेल का दिला नाही? CJI गवईंनी बार असोसिएशला फटकारले

सरन्यायाधीश बीआर गवई (CJI BR Gavai) यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) वकिलांच्या संघटनेवर टीका केली.

CJI BR Gavai Slams Bar Association: न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी (Bela M Trivedi) यांच्या निवृत्तीनिमित्त निरोप समारंभाचे (Farewell ceremony) आयोजन करण्यात न आल्यानं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) वकिलांच्या संघटनेवर (Bar Association) जोरदार टीका केली. तसेच बार असोसिएशनने (Bar Association) अशी भूमिका घ्यायला नको होती, असंही गवईंनी सुनावलं.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारत-अ संघ जाहीर, इशान किशनसह ‘या’ स्टार खेळाडूला संधी 

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती त्रिवेदी आज (दि. १६ मे) निवृत्त झाल्या. न्यायमूर्ती त्रिवेदी ९ जून रोजी निवृत्त होणार होत्या. परंतु शुक्रवार हा त्यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस होता. अमेरिकेत एका कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी त्यांना जावे लागणार असल्यामुळे शुक्रवारीच त्यांनी काम थांबवले. दरम्यान, निवृत्त होत असलेले न्यायाधीश त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीशांबरोबर औपचारिक खंडपीठात सहभागी होत त्यांच्याबरोबर बसतात, अशी सर्वोच्च न्यायालयात प्रथा आहे. तसेच न्यायाधीशांना शेवटच्या दिवशी निरोप समारंभ आयोजित करणे ही सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनची परंपरा आहे. मात्र, वकिलाच्या संघटनेनं या परंपरेला फाटा दिला. संघटनेनं न्यायाधीश त्रिवेदींच्या निरोप समारंभाची घोषणा न केल्यानं सरन्यायाधीश गवई आणि न्यायाधीश एजी मसीह यांनी वकिलांच्या संघटनेवर ताशेरे ओढले.

पिंपरी चिंचवडमधील चिखली-कुदळवाडी टीपी स्कीम रद्द; प्रशासन झुकले, स्थानिकांच्या आंदोलनाला यश… 

अशी भूमिका घ्यायला नको होती..
सरन्यायाधीश म्हणाले, मी थेट बोलण्यावर विश्वास ठेवतो. वकिलांच्या संघटनेनं अशी भूमिका घ्यायला नको होती. तर औपचारिक खंडपीठाच्या कामकाजात बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल आणि रचना श्रीवास्तव यांनी उपस्थिती दर्शवल्याने सरन्यायाधीशांनी त्यांचं कौतुक केलं. सरन्यायाधीश म्हणाले, कपिल सिब्बल आणि रचना श्रीवास्तव दोघेही येथे उपस्थित आहेत याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

प्रथा-परंपरांचा आदर करा…
तर न्यायमूर्ती मसीह म्हणाले, मला माफ करा, पण मला हे बोलावं लागत आहे. प्रथा-परंपरांचा आदर केला पाहिजे. चांगल्या परंपरा चालू राहिल्या पाहिजेत. मी न्यायाधीश त्रिवेदी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक ठरतील.

दरम्यान, वकिलांच्या संघटनेनं न्यायाधीस त्रिवेदी यांचा निरोप समारंभ का आयोजित केला नाही याचे नेमके कारण समजू शकले नाही. तथापि, गेल्या वर्षी न्यायमूर्ती त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सीबीआयला एका प्रकरणात वकिलांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळं त्रिवेदी यांच्या निर्णयावर संघटनेने नाराजी व्यक्त केली होती.

follow us

संबंधित बातम्या