CJI Surya Kant On Youth unemployment: एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत (Surya Kant) यांनी एक निरीक्षण नोंदविताना देशातील तरुण बेरोजगारांना झुरळांसारखे म्हटलंय. पुढे हे तरुण माध्यमे, आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात, असे टिप्पणी सरन्यायाधीशांनी केलीय. तसेच वकिलांच्या पदव्यांवरही सरन्यायाधीशांनी गंभीर शंका उपस्थित केलीय.
Video : तुझा संतोष देशमुख करू; गेवराईजवळ किर्तकार महाराजांना बेदम मारहाण
एका वकिलाने स्वत: ला वरिष्ठ वकील पद द्यावे, यासाठी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. याचिकेवरून सरन्यायाधीशांनी वकिलाला फटकारत एक टिप्पणी केलीय. समाजात आधीच ‘परजीवी’ आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात. तुम्हाला त्यांच्याशी हातमिळवणी करायची आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. संपूर्ण जग वरिष्ठ वकील होण्यास पात्र असेल, पण किमान तुम्ही तरी त्यासाठी पात्र नाही, जर दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला वरिष्ठ वकीलपद बहाल केले, तर सर्वोच्च न्यायालय त्याचे व्यावसायिक वर्तन पाहून ते रद्द करेल, अशी टिपप्णी सरन्यायाधीशांनी केलीय.
STORY | Unemployed 'youngsters like cockroaches' become media, activists; attack system: CJI
Likening some unemployed youngsters to cockroaches, Chief Justice of India (CJI) Surya Kant on Friday said they go on to "become" media, social media and RTI activists and start… pic.twitter.com/iHSMgtWZ7p
— Press Trust of India (@PTI_News) May 15, 2026
झुरळांसारखे काही तरुण आहेत. ज्यांना कोणतीही नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायात कोणतेही स्थान नाही. त्यापैकी काही मीडिया बनतात, काही सोशल मीडिया, आरटीआय कार्यकर्ते आणि इतर कार्यकर्ते बनतात आणि ते सर्वांवर हल्ला करू लागतात, असे सरन्यायाधीश म्हणाले.
बार कौन्सिल ऑफ इंडियाला मते हवी आहेत-सरन्यायाधीश
वरिष्ठ वकील पद हे एखाद्या व्यक्तीला प्रदान केले जाते आणि त्यासाठी पाठपुरावा करायचा नसतो. तुम्ही त्यासाठी पाठपुरावा करत आहात. हे योग्य वाटते का ? वरिष्ठ वकील पद हे केवळ शोभेसाठी बाळगण्याचे प्रतिष्ठेचे प्रतीक आहे का ? असा सवाल ही सरन्यायाधीशांनी विचारला. न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, काळ्या वेशात (वकील) असलेल्या अनेकांच्या पदव्यांच्या सत्यतेवर गंभीर शंका आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (CBI) त्यांच्या पदव्यांची पडताळणी करण्यास सांगावे, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. सरन्यायाधीशांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाला फटकारले आहे. ते या विषयावर कधीही काहीही करणार नाही, कारण त्यांना त्यांची मते हवी आहेत, असे सरन्यायाधीशांनी म्हटलंय.
