TISS चा दीक्षांत समारंभ अचानक रद्द; प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते सरन्यायाधीश सूर्यकांत

टीसने याबाबत शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. या निवेदनात TISS प्रशासनाने स्पष्ट समारंभाबाबत स्पष्टीकरण दिले.

News Photo   2026 08 01T183455.987

TISS चा दीक्षांत समारंभ अचानक रद्द; प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते सरन्यायाधीश सूर्यकांत

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील  (CJI) तरुणांबाबत झुरळांचा उल्लेख केल्यामुळे तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आणि या कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली. याच कॉकरोच जनता पार्टीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, सरन्यायाधीश प्रमुख पाहुणे असलेल्या मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अर्थात TISS या शिक्षण संस्थेचा दीक्षांत समारंभ ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे.

या समारंभाच्या वेळी सीजेपीची निगडीत असणारे आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळंच सुरक्षा तसंच अन्य व्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून हा दीक्षांत समारंभ सध्या स्थगित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 ऑगस्ट रोजी 86 वा वार्षिक दीक्षांत समारंभ होणार होता. परंतु, हा कार्यक्रम ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला आहे.

RTI कार्यकर्ता, शोध पत्रकार ते CJP आंदोलनाचा चेहरा; कोण आहेत सौरभ दास?

या समारंभासाठी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार होते. मात्र कार्यक्रमाच्या अवघ्या दोन दिवस आधी TISS प्रशासनाने विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे समारंभ स्थगित करण्यात आल्याची माहिती दिली. संस्थेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीत काही विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांसमोर आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

कार्यक्रमादरम्यान CJP आंदोलनाशी संबंधित निदर्शने किंवा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणूनच घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. टीसने याबाबत शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. या निवेदनात TISS प्रशासनाने स्पष्ट समारंभाबाबत स्पष्टीकरण दिले. सध्याच्या परिस्थितीत दीक्षांत समारंभ पार पाडणे शक्य नव्हते. विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, मान्यवर पाहुणे आणि संपूर्ण परिसराची सुरक्षा लक्षात घेऊन समारंभ पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला, असे या निवेदनात सांगण्यात आले.

Exit mobile version