Deepender Hooda : जम्मू आणि काश्मीर येथील पहगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानच्या 9 ठिकाणी हवाई हल्ले करत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारले. या ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान बोलताना काँग्रेसचे (Congress) खासदार दीपेंद्र हुडा (Deepender Hooda) यांनी सरकारवर टीका करत भारतातील मॅकडोनाल्ड बंद करण्याची मागणी केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 28 वेळा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा उल्लेख केला पण भारताचे प्रमुख ट्रम्प यांना उत्तर देत नाही. त्यामुळे भारताने त्यांना उत्तर द्यावे किंवा भारतातील मॅकडोनाल्ड बंद करावा अशी मागणी लोकसभेत बोलताना खासदार दीपेंद्र हुडा यांनी केली.
लोकसभेत बोलताना दीपेंद्र हुडा म्हणाले की, काँग्रेस खासदार दीपेंदर हुडा म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अनेक वेळा युद्धबंदी लागू करण्याचा दावा केला. ते तिथेच थांबले नाहीत, व्यापार थांबवण्याची धमकी दिली. ट्रम्प इथेच थांबले नाहीत. त्यांनी दावा केला की पाकिस्तानकडून भारताचे 5 लढाऊ विमाने पाडण्यात आली. ट्रम्प यांनी काश्मीरचाही उल्लेख केला.
कांग्रेस के सांसद दीपेंद्र हुड्डा ने आज लोकसभा में कहा कि या तो अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड का मुंह बंद करवाओ या फिर भारत में McDonald को बंद करवाओ यानी की व्यापार की चोट मारना ज़रूरी है। pic.twitter.com/l14hv1Wfoe
— Aadesh Rawal (@AadeshRawal) July 28, 2025
हुडा म्हणाले की अमेरिकेला भारताशी कसे संबंध हवे आहेत हे देखील निवडावे लागेल. अमेरिका भारताची तुलना पाकिस्तानशी करू शकत नाही. भारताने अमेरिकेला उत्तर द्यावे किंवा देशातील मॅकडोन्लाड बंद करावे.
संधी होती घालवली, एकही देश भारताच्या बाजूने नाही; अरविंद सावंतांचा मोदींवर हल्लाबोल
चीनवर कारवाई का नाही?
पुढे बोलताना खासदार दीपेंद्र हुडा म्हणाले की, असीम मुनीर अमेरिकेत जेवण करत होते. त्यानंतर मुनीर ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याबद्दल बोलत होते. त्याच दिवशी चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात त्रिपक्षीय चर्चा सुरू होती. भारतीय लष्कराचे उप-सीडीएस राहुल सिंग यांनी चीन पाकिस्तानला सर्व गोष्टींमध्ये पाठिंबा देत असल्याचे विधान केले होते. हुडा यांनी दावा केला की पाकिस्तानच्या डीजीएमओने असेही म्हटले होते की युद्धादरम्यान, चीनचे राजदूत पाकिस्तानच्या लष्कराच्या मुख्यालयात बसले होते. पण दिल्लीतील चिनी राजदूताला बोलावूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. परराष्ट्रमंत्री चीनशी संबंध सुधारत असल्याचे सांगत आहेत.