Operation Sindoor : 21 पैकी 9 च टार्गेट, किती विमाने पाडली? काँग्रेस खासदार गौरव गोगोई भडकले

Operation Sindoor : 21 पैकी 9 च टार्गेट, किती विमाने पाडली? काँग्रेस खासदार गौरव गोगोई भडकले

Gaurav Gogoi On Operation Sindoor : पावसाळी अधिवेशनात आजपासून लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा सुरु झाली असून या चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) देखील सहभाग घेणार आहे. तर दुसरीकडे या चर्चेची सुरुवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी करत विरोधकांवर हल्लाबोल केला. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस खासदार गौरव गोगोई (Gaurav Gogoi) यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राफेलची किंमत अनेक कोटी रुपयांची आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प 4 ते 5 विमाने पडल्याचे म्हणत आहेत. सरकारने खरा आकडा उघड करावा. असं लोकसभेत बोलताना खासदार गौरव गोगोई म्हणाले. तर लष्कराने आधी सांगितले होते की 21 टार्गेट निश्चित करण्यात आले होते मात्र 9 वरच हल्ला का झाला, टार्गेट का कमी केली गेली? असा प्रश्न लोकसभेत बोलताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी उपस्थित केला.

तर दुसरीकडे जेव्हा पहलगाम हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. तिकडून परतल्यानंतर ते बिहारला गेले आणि निवडणूक रॅली केली मात्र मोदी पहलगामला गेले नाही. अशी टीका खासदार गौरव गोगोई यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.

अचानक शरणागती का पत्करली?

चर्चेत बोलताना खासदार गोगोई म्हणाले की, संपूर्ण देश आणि विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाठिंबा दिला होता. मात्र अचानक 10 मे रोजी आम्हाला कळले की, युद्धबंदी झाली पण का? याचा उत्तर आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे. जर पाकिस्तानचा पराभव होत होता तर आपण अचानक शरणागती का पत्कारली? अमेरिकेच्या राष्ट्राध्याक्षांनी 26 वेळा म्हटले आहे की त्यांनी भारत आणि पाकिस्तानला युध्दबंदी जाहीर करण्यास भाग पाडले असं देखील खासदार गोगोई म्हणाले.

आमिर खानच्या घरी पोहोचले IPS अधिकारी, खरे कारण आले समोर

किती लढाऊ विमाने पडली ?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सांगतात की, भारताचे 4-5 जेट विमाने पडली आहेत. प्रत्येक विमानाची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. म्हणून, आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगावे, देशावर विश्वास ठेवावा. देशाकडे सत्य ऐकण्याची हिंमत आहे. किती लढाऊ विमाने पडली हे सांगा. कारण हे सत्य केवळ देशातील नागरिकांनाच नाही तर देशातील सैनिकांनाही सांगावे लागेल. अशी टीका देखील खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत बोलताना सरकारवर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube