तुमच्या पक्षाचा ‘हवेचा फुगा’ जनतेने फोडला; मोदींवरील टीकेवरून बावनकुळेंचा राहुल गांधींवर पलटवार

तुमच्या पक्षाचा ‘हवेचा फुगा’ जनतेने फोडला; मोदींवरील टीकेवरून बावनकुळेंचा राहुल गांधींवर पलटवार

Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी कायम लक्षात (Rahul Gandh) ठेवायला हवे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘शो’ नाहीत, ते ‘विकासाचा रोड शो’ आहेत. मोदी म्हणजे दिशा तर राहुल गांधी म्हणजे दिशाभूल हे देशातील जनतेनं ओळखले आहे अशा शब्दांत भाजपे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांनी काल एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

राहुल गांधी, हा देश तुमच्या भाषणांवर चालत नाही. तो आकड्यांवर, कामांवर आणि जनतेच्या विश्वासावर चालतो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात भक्कम झेप घेतली आहे. देशातील तब्बल २५ कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून वर काढण्यात यश मिळालं आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी ही काय मोठी समस्या नाही; मीडियाने फुगा केलाय, राहुल गांधींचा थेट वार

केंद्रातील मोदी सरकारने ८० कोटींहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली. ही फक्त आकडेवारी नाही, तर कोट्यवधी कुटुंबांच्या आयुष्यात घडलेली क्रांती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली. ही फक्त आकडेवारी नाही, तर कोट्यवधी कुटुंबांच्या आयुष्यात घडलेली क्रांती आहे.

देशाच्या 140 कोटी जनतेनं सलग तिसऱ्यांदा मोदींवर विश्वास ठेवला, पूर्ण बहुमत दिलंय. त्या नेत्याबद्दल अशी भाषा वापरणं म्हणजे लोकशाहीचा, जनतेचा अपमान आहे. राहुल गांधी, तुमची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचं, नैराश्याचं आणि त्यांच्या अपयशाचं जिवंत उदाहरण आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

मोदी म्हणजे काही मोठी समस्या नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही डोक्यावर बसलवयं. मीडियावाल्यांनी फुगा तयार केला. पूर्वी तर मी भेटलो नव्हतो. आता मी दोन-तीन वेळेस भेटलो. मला आता समजलं, त्यांच्यात काहीच नाही. सगळा शो आहे. काही दम नाही. तुम्ही त्यांना भेटले नाहीत, मी भेटलोय. त्यांच्यासोबत रूममध्ये बसलो. चर्चा केली आहे. काही नाही फक्त शो आहे असंही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube