उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काल एका अज्ञात युवकाने 112 क्रमांकावर मेसेजद्वारे योगी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आयुक्तायल पोलिसांकडून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
देशात 13 वर्षात 9 नक्षलवादी हल्ले अन् आत्तापर्यंत ‘एवढे’ जवान शहीद
मुख्यमंत्री योगी यांनी धमकी देणार युवक बाबुपूरवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेगमपुरवा इथला रहिवासी असून अमीन उर्फ छोटू अस त्याचं नाव आहे. या युवकाने त्याच्या कथित प्रेयसीच्या वडिलांकडून बदला घेण्यासाठी मुख्यमंत्री योगींना धमकी दिल्याचं माहिती समोर आली आहे.
Dahaad Teaser Release: कल्पनेपलिकडच्या वास्तवाची गोष्ट, ‘दहाड’चा थरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेयसीच्या वडिलांना अमीन आवडत नव्हता. काही दिवसांपूर्वीच प्रेयसीच्या वडिलांना त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यानंतर वडिलांनी त्यांच्या भेटीवर निर्बंध आणले होते. आपल्या प्रेयसीच्या वडिलांनी निर्बंध आणल्याचा राग मनात धरत अमीनने प्रेसयीच्या वडिलांचा मोबाईल चोरला. मंगळवारी त्यांनी मोबाईला वापर केला आहे. त्याने 112 नंबर डायल करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी आल्यानंतर पोलिस यंत्रणेकडून तत्काळ तपासाची चक्रे फिरवत चौकशी केली. अमीनने हा मोबाईल फोन दहा दिवसांपूर्वी चोरला होता. आपल्या प्रेयसीच्या वडिलांचा बदला घेण्याचा उद्देश मनाशी बाळगून त्याने हे कृत्य केलं असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. तसेच आरोपी अमीनला बाबुपूरवा पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक संतोष सिंह यांनी दिलीय.