Download App

Himanta Biswa : ‘नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील पैसे तुम्ही कुठे लपवले?

  • Written By: Last Updated:

CM Himanta Biswa’s counterattack on Rahul Gandhi’s : गेल्या काही दिवसांपासून अदानी समुहाच्या (Adani Group) मुद्यावरून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) जोरदार टीका करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करत अदानी समुहाच्य शेल कंपनीतील 20 हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? असा सवाल राहुल गांधींनी केला होता. आजही राहुल यांनी ट्विट करून गौतम अदानी यांच्यावर टीका केली. दरम्यान, आता राहुल गांधींच्या या टीकेवप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा (Himanta Biswa) यांनी चांगलाच पटलवार केला आहे. नॅशनल हेरॉल्ड (National Herald) घोटाळ्यातून मिळालेला पैसा कुठं लपवला असा सवाल त्यांनी केला आहे.

राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटरवर अदानी प्रकरणासंदर्भात एका कोड्याचा फोटो टि्वट केला होता. ज्यावर स्पष्ट शब्दात अदानी असं लिहिलेलं दिसत आहे. त्याचबरोबर यात त्यांनी गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, एन किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अॅंटोनी यांचीही नावे टाकली आहेत. राहुल गांधी यांनी ज्या पाच नेत्यांचा उल्लेख केला आहे. त्यातील चार नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहेत. तर गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसला रामराम केल्यानंतर स्वत:चा पक्ष काढला आहे. दरम्यान, या फोटोला कॅप्शन देत राहुल यांनी लिहिलं की, ते सत्य लपवतात, म्हणूनच ते दररोज दिशाभूल करतात. प्रश्न असा आहे की, अदीनींच्या कंपन्यांमध्ये 20 हजार कोटींचा बेनामी पैसा कोणाचा आहे, असं ट्विट त्यांनी केलं.

बोफोर्स घोटाळ्याचे पैसे कुठे गेले हे आम्ही विचारले नाही – मुख्यमंत्री सरमा
राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोत आपलं नाव बघून हिमंता बिस्वा शर्मा चांगलेच संतापले. राहुल गांधींच्या या ट्विटला रिट्विट करत सीएम सरमा यांनी लिहिले की, बोफोर्स आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यांमधून कमावलेला गुन्हेगारीचा पैसा तुम्ही कुठे लपवला हे आम्ही तुम्हाला कधीच विचारले नाही, ही आमची शालीनता आहे. तसेच तुम्ही किती वेळा ओटावियो क्वात्रोचीला भारतीय न्यायव्यवस्थेच्या तावडीतून कसे सुटू दिले? हे देखील विचारलं नाही. पण, आता न्यायालयातच भेटू असा इशारा त्यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले

अदानी प्रकरणाबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारवर हल्लाबोल करत असून सरकार अदानींना वाचवत असल्याचा आरोप करत आहेत. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये वीस हजार कोटी रुपये गुंतवल्याचा काँग्रेसचा दावा आहे, पण हे वीस हजार कोटी रुपये कोणाचे आहेत हे सांगण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या गौतम अदानी यांचे चिनी नागरिकांशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

Tags

follow us