केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले

  • Written By: Published:
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने धडक दिली. या अपघातात किरेन रिजिजू थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने या अपघातात त्यांना दुखापत झाली नाही. ते सध्या पूर्णपणे बरे आहेत. जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने धडक दिली.

रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा ताफा जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, तेथून जाणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. यानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घाईगडबडीत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना गाडीतून बाहेर काढले आणि दुसऱ्या वाहनात बसवले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्र्यांची कार आणि ट्रकची धडक दिसत आहे. तसेच या घटनेनंतर सुरक्षा कर्मचारी किरेन रिजिजू यांच्या गाडीजवळ धावताना दिसत आहेत. त्यानंतर ते केंद्रीय मंत्र्याला गाडीतून उतरवून दुसऱ्या वाहनाकडे नेताना दिसत आहेत.

Himanta Biswa : ‘नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील पैसे तुम्ही कुठे लपवले? 

रामबन पोलिसांच्या वतीने या प्रकरणाची माहिती देताना असे म्हटले आहे की, आज जम्मूहून श्रीनगरला रस्त्याने जात असताना केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. किरेन रिजिजू यांना सुखरूप त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube