CM Vijay Josef : तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय (CM Vijay Josef ) यांनी सत्तेवर आल्यानंतर मोठा निर्णय घेत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी वीज सुधारणा योजनांपैकी एक असलेल्या सुमारे 20 हजार कोटींच्या ‘स्मार्ट मीटर प्रकल्पाला’ स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पाला स्थगिती देत विजय थलपती यांनी केंद्र सरकारसह उद्योजक गौतम अदानी यांना मोठा धक्काच दिला आहे.
तमिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशनने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी काढलेला जागतिक निविदा (टेंडर) रद्द केला होता. या निविदेमध्ये Adani Energy Solutions ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी होती. मात्र, कंपनीने दिलेली किंमत अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे कारण देत राज्य सरकारने संपूर्ण टेंडर प्रक्रिया रद्द केल्याचे सांगितले होते.
या प्रकल्पाअंतर्गत चेन्नईसह आठ जिल्ह्यांमध्ये तब्बल 82 लाखांहून अधिक स्मार्ट मीटर बसविण्याची योजना होती. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या रिवॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम (RDSS) अंतर्गत राबविण्यात येणार होता. मात्र वाढीव खर्चामुळे सरकारने नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
फिट राहण्यासाठी वयोगटानुसार नेमकं किती चालावे?; जाणून घ्या, चालण्याचे अचूक नियम अन् फायदे
