फिट राहण्यासाठी वयोगटानुसार नेमकं किती चालावे?; जाणून घ्या, चालण्याचे अचूक नियम अन् फायदे

Walking benefits प्रत्येक वयोगटासाठी चालण्याचे प्रमाण वेगळे असते? जास्त चालणे किंवा कमी चालणे, याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?

  • Written By: Published:
Walking benefits

How Many Kilometers Should Walk Daily According To Age : सध्याच्या धावपळीच्या युगात फिट राहण्यासाठी वॉक (Walking) हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, प्रत्येक वयोगटासाठी चालण्याचे प्रमाण वेगळे असते? जास्त चालणे किंवा कमी चालणे, याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? याचबद्दल आपण जाणून घेऊया…

वयोमानानुसार कुणी किती अंतर चालावे?

सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की, चालण्याचा कोणताही एकच नियम सर्वांना लागू होत नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आणि अमेरिकन आरोग्य संस्था CDC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपण एक आदर्श निकष लावू शकतो. ज्यात 18 ते 64 वयोगटातील प्रौढ व्यक्तींनी दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम गतीने शारीरिक हालचाल करणे गरजेचे आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही दररोज सरासरी 3 ते 5 किलोमीटर चालून तुमचे आरोग्य उत्तम ठेवू शकता.

ज्येष्ठांसाठीही 150 मिनिटांचेच ध्येय ठेवले जाते. मात्र, चालण्यासोबतच त्यांनी संतुलन राखणारे आणि स्नायू मजबूत करणारे व्यायाम करणे आवश्यक आहे, जेणेकरून पडण्याचा किंवा दुखापतीचा धोका टळण्यास मदत होईल. मुले आणि किशोरवयीन म्हणजेच 5 ते 17 वयोगटातील लहान मुलांनी आणि तरुणांनी दररोज किमान 60 मिनिटे शारीरिक हालचाल करणे अत्यंत गरजेचे आहे.

चालण्याचे नेमके फायदे काय?

आता प्रश्न उरतो की, रोज चालल्याने नक्की काय फायदे होतात? तर, सगळ्या महत्त्वाचं म्हणजे दररोज चालल्याने कॅलरी बर्न होतात, ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. चालण्यामुळे रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित राहतो आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. खासकरून जेवणानंतर केलेली हलकीशी सैर रक्तातील साखरेचे प्रमाण (Blood Sugar Level) नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. चालण्यामुळे सांधे आणि स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. तसेच, रोजच्या व्यायामामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्ही आजारांपासून दूर राहता. मग, विचार कसला करताय तुमच्या डेली रूटीनमध्ये वॉकचा समावेश करा आणि फिट राहा.

follow us