CNG Price Hike : देशात गेल्या काही दिवसांपासून महागात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलसह सीएनजीच्या दरात देखील आता मोठी वाढ होत असल्याने अनेकांचे बजेट बिघडले आहे. तर आता सर्वसामान्य नागरिकांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. देशात पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आले आहे.
आजपासून सीएनजीच्या (CNG Price Hike) दरात प्रतिकिलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये चैथ्यांदा सीएनजीचे दर वाढल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी 23 मे रोजी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती.
नवीन दरवाढ लागू झाल्यानंतर आता देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) सीएनजीचा दर प्रति किलो 83.09 रुपये झाला आहे. तर मुंबईत (Mumbai) दर वाढून प्रति किलो 84 रुपये झाले आहेत. तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद येथील सीएनजीचे दर वाढून प्रति किलो 88.70 वर पोहोचले आहेत.
CNG rates have been increased by Rs 2 from today, 26th May.
— ANI (@ANI) May 26, 2026
तर दुसरीकडे सोमवारी देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel Price) किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सोमवार 25 मे पासून देशात पेट्रोल प्रति लिटर 2.61 रुपयांनी तर डिझेल 2.71 रुपयांनी महाग झाले आहे. 15 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत 8 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोल 111 रुपये प्रतिलिटर झाला आहे तर डिझेल देखील 98 रुपये प्रतिलिटर विकला जात आहे. 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रतिलिटर मागे 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यानंतर 19 मे आणि 23 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली होती.
शेतकऱ्यांना दिलासा; आजपासून 1580 रूपये प्रति क्विंटल दराने होणार कांदा खरेदी-
