Onion Price : शेतकऱ्यांना दिलासा; आजपासून 1580 रूपये प्रति क्विंटल दराने होणार कांदा खरेदी
Onion Price : वाढत असणाऱ्या महागाईत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार 26 मे पासून सरकारकडून
Onion Price : वाढत असणाऱ्या महागाईत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार 26 मे पासून सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज पासून 1580 रूपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. आतापर्यंत 1235 रुपये प्रति क्विंटल या दराने सरकारकडून कांदा खरेदी करण्यात येत होता.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अवकाळी पावसामुळे वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी कांद्याच्या दरात वाढ करण्यात यावी अशी मागणी केली होती. तर आता या मागणीला मान्य करत सरकारने प्रति क्विटल काद्यांच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नाफेड (NAFED) , NCCF कडून कांद्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या वाढीनुसार, 26 मे पासून 1580 रूपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. यापूर्वी सरकारकडून 1235 रुपये प्रति क्विंटल या दराने कांदा खरेदी करण्यात येत होता. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वृश्चिक राशीसह ‘या’ राशींना होणार धनप्राप्ती अन् नशीब देणार साथ; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार?
कांदा उत्पादनासाठी 20 ते 25 रुपये प्रति किलो खर्च येत असून औषधे, मजुरी, खत आणि वाहतूक खर्च वाढत असल्याने उत्पादन खर्चावर आधारित योग्य बाजारभाव निश्चित करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.