Download App

अनंतनागमध्ये दुर्देवी घटना; दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन अधिकारी शहीद

Anantnag Encounter: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये कोकरनाग भागात आज (13 सप्टेंबर) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट शहीद झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारात कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष, जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट गंभीर जखमी झाले होते. नंतर त्यांचा जास्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गडोले भागात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मंगळवारी (12 सप्टेंबर) संध्याकाळी सुरू झाली होती, मात्र ती रात्री थांबवण्यात आली. ते म्हणाले की दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी शोधमोहिम सुरू करण्यात आला होती.

राजौरी येथेही चकमक
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथेही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. पीटीआय वृत्तसंस्थाने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, बुधवारीच राजौरी येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आणखी एका दहशतवाद्याला ठार केले. यासह राजौरी जिल्ह्यातील दुर्गम नारला गावात तीन दिवस चाललेल्या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या तीन झाली आहे.

‘शेवटी चीनचा खरा नकाशा सापडला’; मनोज नरवणेंकडून फोटो ट्विट…

पाकिस्तानी दहशतवादी ठार
दुर्गम नारला गावात मंगळवारी झालेल्या चकमकीत एका संशयित पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या गोळीबारात लष्कराचा एक जवान आणि लष्कराच्या डॉग युनिटमधील एक सहा वर्षीय महिला लॅब्राडोर केंटही शहीद झाली, तर तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.

या वर्षी किती दहशतवादी मारले गेले?
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राजौरी आणि पूंछ या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये यावर्षी झालेल्या चकमकीत सुमारे 26 दहशतवादी मारले गेले आणि 10 सुरक्षा जवान शहीद झाले. सीमेपलीकडून घुसण्याच्या प्रयत्नात बहुतांश दहशतवादी मारले गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘इंडिया’ची पहिली सभा ठरली! भोपाळमध्ये ‘इंडिया’ आघाडीची जाहीर सभा…

रियासी जिल्ह्यातील चासना भागाजवळील गली सोहब गावात 4 सप्टेंबर रोजी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.

Tags

follow us