Download App

सरकारचा जनतेला मोठा धक्का; LPG सिलिंडर महागले, तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी महाग

LPG Price 1 March : देशात पुढील काही दिवसांतच आगामी लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असतानाच सरकारने जनतेला मोठा धक्काच दिला आहे. एलपीजी सिलिंडराच्या (LPG Price) दरात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आजपासून दिल्लीसह मुंबईत एलपीजी सिलिंडर 25.50 रुपयांनी महागणार आहेत. तसेच कोलकत्यातही ही वाढ 24 रुपयांनी होणार आहे. त्यामुळे जनतेला हा सरकारचा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

गडाखांच्या विरोधात भाजप भास्करगिरी महाराजांना मैदानात उतरविणार ? देवगड संस्थानचा थेट खुलासा

तेल विपणन कंपन्यांकडून आज एलपीजी सिलिंडरचे दर अपडेट करण्यात आले आहेत. देशातल्या मेरठ, दिल्लीसह जयपूर, इंदौर लखनौ आणि मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ फक्त 19 किलो व्यावसायिक सिलिंडराच्या दरात करण्यात आली आहे. तर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांना सरकारकडून तुर्तास तरी दिलासा देण्यात आला असून अद्याप त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Sandeshkhali Violence : संदेशखाली हिंसाचार प्रकरण; TMCचे नेते शेख शहाजहाँ यांना अटक

तेल विपनण कंपन्यांच्या वाढीव दरानूसार आजपासून मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचा दर आता 1749 रुपये इतका झाला असून चेन्नईमध्ये 1960 रुपये असणार आहे. तर दिल्लीमध्येही ही वाढ करण्यात आली असून दिल्लीत 1769.50 रुपयांऐवजी 1995 रुपयांना मिळणार आहे.

फडणवीसांनी ‘मराठा’ समाजासाठी काय केले? जरांगेंच्या आरोपांनंतर भाजपने समोर आणली ‘कामांची’ यादी

follow us