Download App

LPG Price : गुडन्यूज! नववर्षाआधीच LPG गॅसच्या दरात मोठ्ठी कपात; व्यावसायिकांना दिलासा

LPG Price : नवीन वर्ष सुरू होण्याला काही दिवस बाकी असतानाच गॅस कंपन्यांनी व्यावसायिक ग्राहकांना सुखद (LPG Price) धक्का दिला आहे. महिना संपण्याच्या आतच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. ही दरकपात फक्त व्यावसायिक गॅसच्या दरात करण्यात आली आहे. घरगुती गॅसच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. या निर्णयानुसार व्यावसायिक गॅस सिलिंडर 39.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. याआधी 1 डिसेंबर रोजी गॅस दर वाढले होते. त्यावेळीही फक्त व्यावसायिक गॅसच्या दरात 21 रुपये वाढ करण्यात आली होती. आताही फक्त याच गॅसचे दर कमी केले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आताही घरगुती गॅसच्या दरात काहीही बदल केलेला नाही.

LPG Price Hike : महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! LPG गॅसच्या दरात मोठ्ठी वाढ

गॅस कंपन्यांच्या या निर्णयामुळे आजपासून दिल्लीत कमर्शिअल गॅस सिलिंडर 1757 रुपयांना मिळेल. याआधी हा सिलिंडर 1796.50 रुपयांना मिळत होता. कोलकात्यात 1868.50 रुपयांना 19 किलोचा गॅस सिलिंडर मिळेल. मुंबईत 1710 रुपये तर चेन्नईत 1929 रुपयांना हा सिलिंडर मिळेल. याआधी 1 डिसेंबर रोजी व्यावसायिक गॅसचे दर वाढविण्यात आले होते. त्यानंतर आता महिना संपण्याच्या आत या गॅसचे दर कमी करत सरकारने व्यावसायिक ग्राहकांना गिफ्ट दिलं आहे.

घरगुती गॅस जैसे थे 

या दरवाढीतून घरगुती गॅसधारकांना दिलासा मिळाला आहे. या गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दोन महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ झालेली नाही. याआधी ऑगस्ट महिन्यात दर कपात करण्यात आली होती. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडर ऑगस्ट महिन्यातील दरावरच मिळत आहे. दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये तर चेन्नई 918.50 रुपये या दरांत घरगुती गॅस मिळत आहे.

खूशखबर! LPG गॅस सिलिंडरच्या दरात 57. 5 रुपयांची कपात, जाणून घ्या नवे दर

सप्टेंबरमध्येही दरात केली होती कपात

दरम्यान, याआधी 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder ) किंमती कमी करण्यात आल्या होत्या. 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 157 रूपये कमी किंमतीत मिळत होता. व्यावसायिक गॅस सिलेंडर हा 19 किलोंचा असतो. व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी केल्याने अप्रत्यक्षपणे नागरिकांनाही दिलासा मिळाला होता. मात्र थेट दोनशे रुपयांनी वाढ करत सरकारने हा दिलासा फार काळ टिकू दिला नव्हता. त्यानंतर आता दर कपात करण्यात आली आहे.

Tags

follow us