Download App

शिवजयंतीला दिल्लीच्या ‘जेएनयू’मध्ये पुन्हा गोंधळ

नवी दिल्ली : दिल्लीमधील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापिठात म्हणजेच JNU मध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याचं समजतंय. शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेवरून हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभाविप कडून एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा अभाविपचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर ABVP आणि JNU च्या विद्यार्थ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याबद्दल अद्याप विद्यापीठाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी झाला गुन्हा दाखल

अभाविपनं म्हटलंय की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे स्टुडंट अॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. अॅक्टिव्हीटी सेंटरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली. मात्र, एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी प्रतिमेचा अवमान केला. प्रतिमेला घातलेला हार देखील कचऱ्याच्या डब्ब्यात फेकण्यात आल्याची माहिती ABVP च्या महासचिवांनी दिलीय.

दुसरीकडं जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थी संघटनेनं (JNUSU) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हल्ला केल्याचा आरोप लगावलाय. JNUSU च्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ABVP च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा हॉस्टेलवर हल्ला केलाय. दर्शन सोळंकीच्या वडिलांच्या कॅंडल मार्चनंतर लगेच हा हल्ला केल्याचे JNUSU च्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांना शांत केलंय.

NSUIच्या महासचिवांनी म्हटले की, ABVP च्या विद्यार्थ्यांनी JNUSU च्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होते. JNUSU च्या कार्यालयात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यापूर्वी किंवा प्रतिमा ठेवण्यापूर्वी परवानगीची आवश्यकता असते. असे असताना देखील ABVP कडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या दरम्यान असलेले सर्व फोटो हटवले. त्यामुळे ABVP आणि SFI च्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला.

Tags

follow us