Karnataka : कर्नाटकात काँग्रेसने (Karnataka) 136 जागा जिंकत सरकारही स्थापन केले आहे, सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. असे असले तरी काँग्रेसला कर्नाटक सर करण्यात मोलाचा वाटा उचलणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार नाखूश आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना एक खास आवाहन केलं आहे.
शिवकुमार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 135 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. मात्र तरीही मी नाखूश आहे. माझ्या किंवा सिद्धारामय्या यांच्या घरी येऊ नका. आमचं पुढील लक्ष्य लोकसभा निवडणूक आहे. ती निवडणूक आपल्याला चांगल्या पद्धतीने लढली पाहिजे.
9 Years of Modi Government : मोदींच्या ‘या’ 9 वक्तव्यांनी झाला होता देशभरात हंगामा
कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाचे श्रेय शिवकुमार यांना जाते. त्यामुळेच तर त्यांनी निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला होता. ते काही दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. येथे वरिष्ठ नेत्यांनी बैठका घेतल्या. त्यानंतर खुद्द सोनिया गांधी यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदावरील आपला दावा मागे घेतल्याचे सांगितले जाते.
ज्यावेळी काँग्रेसचे निवडून आलेले सरकार 2018 मध्ये भाजपने पाडले. त्यानंतर पुढील तीन वर्षात मेहनत घेत शिवकुमार यांनी काँग्रेसला पुन्हा उभे केले. संकटकाळात पक्षाला मदत केली. संघटनात्मक कौशल्यामुळे पक्षात त्यांचं वजन वाढलं आहे. इतकेच नाही तर काँग्रेसने आता त्यांच्यावर मध्य प्रदेशचीही जबाबदारी दिली आहे. मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहे. येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्याबरोबर शिवकुमार काम करणार आहेत.
“PM मोदी यांनी नाही तर…” नवीन संसद भवनाच्या उद्घटनावरुन राहुल गांधींची मोठी मागणी
काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडेही महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मात्र शिवकुमार यांच्याकडील कौशल्याचा वापर करून घेण्याच्या दृष्टीने त्यांना जास्त मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी देखील ही जबाबदारी स्वीकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे अन्य राज्यांतील विधानसभाच नाही तर थेट लोकसभा निवडणूक काँग्रेसला जिंकून देण्याच्या उद्देशाने ते कामाला लागले आहेत.