नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आज पुन्हा एकदा कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. कॉंग्रेस (Congress) अजूनही रिमोट कंट्रोलद्वारे चालवली जाते आहे. काही नवीन अनुभव नसलेली मंडळी कॉंग्रेसचा कारभार हाताळत आहेत. कॉंग्रेसच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणजे, सक्षम नेत्यांच्या समांतर इतर नेत्यांना उभं करून सक्षम लोकांना संपवल्या जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘आझाद-एक आत्मकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी काँग्रेस नेते आझाद यांनी यावेळी आपल्या माजी सहकारी नेत्यांसोबत असलेल्या वादांविषयी बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले की मी जितका भूतकाळात जातो तितकी कटुता समोर येते आणि पक्षातून बाहेर पडल्यानंतर मला त्यात पुन्हा डोकावायचे नाही. आझाद यांनी गेल्या वर्षी पक्ष सोडला.
आझाद यांचे राहुल यांच्याशी राजकीय मतभेद
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असलेले आझाद यावेळी बोलतांना म्हणाले की, मी पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचा खूप आदर करतो. मात्र, राहुल गांधींशी माझे राजकीय मतभेद असल्याचे त्यांनी कबूल केले. ते म्हणाले की, एक व्यक्ती म्हणून मी राहुल गांधी हे वाईट व्यक्ती असल्याचे म्हणत नाही. राहुल हे व्यक्ती म्हणून चांगले माणूस आहेत. आमच्यात काही राजकीय मतभेद असतील, पण ते राजकीय मुद्दे आहेत, जे मी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यासोबत होते. मी आता काँग्रेसमध्ये नसल्यामुळे मला त्यांच्यासाठी योग्य आणि अयोग्य हे सांगण्याचा अधिकार नाही.
अभिनेत्री रविना टंडनचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मान…
‘राजकारण ही कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची कला
आझाद म्हणाले, “मी फक्त राहुल यांना त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या राजकीय यशासाठी शुभेच्छा देऊ शकतो. राजकारणात पुढे कसे जायचे हे त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांना कठीण परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे माहित आहे. राजकारण ही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची कला आहे. अगदी चांगला कॅप्टन असेल पण, अनुभव नसेल तर जहाज बुडू शकते.
राहुल कॅप्टन आहेत
ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडे आता कोणतेही पद नसले तरी ते जहाजाचे (काँग्रेस) कॅप्टन आहेत हे सर्वांना माहीत आहे. पक्षात कोण निर्णय घेते हे सर्वांना माहीत आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की जर उद्या (मल्लिकार्जुन खर्गे) बेंगळुरूमध्ये CWC (काँग्रेस कार्यकारिणी) बैठक घेऊ इच्छित असेल तर कोणीही जाणार नाही… त्यामुळे राहुल गांधींनी (पक्ष) जहाज नेव्हिगेट करावे अशी माझी इच्छा आहे.
त्यांच्या पुस्तकात, त्यांनी अनेक उदाहरणे सांगितली आहेत. ज्यात त्यांचे राहुल यांच्याशी मतभेद होते, विशेषत: 23 काँग्रेस नेत्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये तत्कालीन पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर. आझाद म्हणाले की, मला अजूनही आश्चर्य वाटते की, आम्ही भाजपचे समर्थक असतो तर संघटना मजबूत करण्याचा सल्ला का दिला असता? असा सवाल त्यांनी केला आहे.