Download App

‘निलंबनाची कारवाई चुकीची, मागे घ्या’; अधीर रंजन चौधरींचं लोकसभा सभापतींना पत्र

Adhir Ranjan Choudhari : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) तृणमूलसह काँग्रेससच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संसदेच्या सुरक्षेबाबत गदारोळ, घोषणाबाजी केल्याप्रकरणी लोकसभेच्या सभापतींनी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Choudhari) यांनी महत्वाची मागणी केली आहे. लोकसभा सभापतींनी केलेली निलंबनाची कारवाई चुकीचं असल्याचं म्हणत कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे.

चार जणांनी संसदेच्या सुरक्षेला छेद दिल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्याचवेळी सभागृहातच सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन गैरवर्तन केल्याप्रकरणी तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्यासह 14 खासदारांवर उर्वरीत सत्रासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Elections 2024 : महाराष्ट्रात भाजपाचा एमपी-राजस्थान पॅटर्न? आमदार-खासदारांचं तिकीटच ‘अनसेफ’

यामध्ये टीएन प्रथापन, हिबी इडन, डीन कुरियाकोसे, जोथी मणी, रम्या हरिदास, काँग्रेस खासदार बेनी बेहनन, मोहम्मद जावेद, पी आर नटराजन, कनिमोझी(डीएमके), वीके श्रीकंदन, के सुब्रमण्यम, एसआर पार्थिबन (डीएमके), एस वेंकटेशन(सीपीआईएम) आणि मनिकम टैगोर यांच्यावर उर्वरीत सत्रासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान, या खासदारांनी सभागृहात ‘पीएम सदन में आओ, अमित शाह शर्म करो’ अशा घोषणा दिल्या आहेत. या घोषणांना काँग्रेसच्या इतर खासदारांनीही समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं होतं. संसदेच्या सभागृहात गोंधळ घातल्या खासदारांवर उर्वरीत सत्रासाठी निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करण्यात आला होता. यामध्ये यांच्यावर उर्वरीत सत्रासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या कारवाईनंतर आता काँग्रेसच्या खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहता येत नाही. संसदीय कामकाजासाठी हिवाळी अधिवेशनात खासदारांची उपस्थिती आवश्यक असून लोकसभेच्या सभापतींनी खासदारांवर केलेल्या कारवाईला चुकीचं असल्याचं चौधरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ही कारवाई तत्काळ मागे घेण्यात यावी, असं पत्रच चौधरी यांनी सभापतींना पाठवलं आहे. या मागणीनंतर लोकसभा सभापती काय निर्णय घेतील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us