पावसाळी अधिवेशनात काँग्रेस भाजपला घेरणार, जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं?

सरकार जी विधेयके मांडण्याच्या तयारीत आहे, त्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्ट केलंय.

Jayram Ramesh

Jayram Ramesh

Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी (Parliament Monsoon Session ) काँग्रेसने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. पक्षाच्या संसदीय रणनीती समितीची दीड तास चाललेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) आणि खासदार नासिर हुसैन( Naseer Hussain) यांनी पत्रकार परिषद घेतली. सरकार जी महत्त्वाची विधेयके मांडण्याच्या तयारीत आहे, त्याला काँग्रेस (Congress) विरोध करणार असल्याचं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलंय. तसेच मतदारसंघांची पुनर्रचना, घटनादुरुस्ती, ‘एक देश, एक निवडणूक’ एफसीआरए (FCRA) मधील सुधारणा आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा यांबाबतच्या प्रस्तावित बदलांना पक्षाचा विरोध असल्याचंही स्पष्ट केलंय.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जाईल…
जयराम रमेश यांनी सांगितले की, पावसाळी अधिवेशनात कोणती विधेयके मांडली जातील, याची अधिकृत माहिती सरकारने अद्याप दिलेली नाही. त्यामुळे, संभाव्य विधेयकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 19 जुलै रोजी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारकडून यासंदर्भात माहिती मागवली जाईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षांच्या मतांना गांभीर्याने घेतले जात नाही…
काँग्रेसने सर्वपक्षीय बैठकांच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या बैठका आता केवळ औपचारिकतेपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. त्यांच्या मते, तिथे अनेक नेते आपली मते मांडत असले तरी, अंतिम निर्णय मात्र काही मोजक्या व्यक्तींकडूनच घेतले जातात. विरोधी पक्षांच्या मतांना गांभीर्याने घेतले जात नाही, असेही त्यांनी सांगितले.

‘तेरा यार हूँ मैं’ चित्रपटात दिसणार नवोदित कलाकार अमन इंद्र कुमार आणि आकांक्षा शर्मा; काय म्हणाले दिग्दर्शक मिलाप मिलन झवेरी?

मतदारसंघांच्या पुनर्रचना आणि घटनादुरुस्तीला तीव्र विरोध करू…
काँग्रेसने जाहीर केले की, जर सरकारने मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे विधेयक (Delimitation Bill) आणले, तर त्याला पूर्ण ताकदीनिशी विरोध केला जाईल. या मुद्द्यावर संपूर्ण विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा पक्षाचा मानस आहे. याव्यतिरिक्त, घटनादुरुस्तीशी संबंधित कोणत्याही प्रस्तावालाही विरोध केला जाईल. जयराम रमेश यांनी आरोप केला की, राजकीय पक्ष फोडून आणि इतर पद्धतींचा वापर करून भाजप लोकसभेत दोन-तृतीयंश बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हे संविधानाच्या मूळ भावनेच्या विरोधात असून काँग्रेस त्याला विरोध करेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता आवाज उठवणार; अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठिंबा

एक देश, एक निवडणूक’ आणि इतर विधेयकांवर घेणार…
तसेच या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ (ONOE) या प्रस्तावावर आणि त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) सादर केलेल्या अहवालावरही चर्चा झाली. काँग्रेसने सांगितले की, ते या प्रस्तावालाही विरोध करतील. तसेच, खासदार, आमदार, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याशी संबंधित कोणत्याही विधेयकाला पक्ष पाठिंबा देणार नाही, असे काँग्रेसच्या संसदीय रणनीती समितीच्या बैठकीत ठरले.

Exit mobile version