राष्ट्रवादी पुन्हा एकत्र? खासदार सुनील तटकरे अन् प्रफुल पटेल भेटीवर काय म्हणाले जयंत पाटील

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची (14 जुलै) भेट घेतल्याने

Jayant Patil

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची (14 जुलै) भेट घेतल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल देखील उपस्थितीत होते अशी चर्चा जोराने राजकीय वर्तुळात सुरु आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर आता या भेटीवर जयंत पाटील  यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी भेट झाली नाही अशी माहिती जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

माध्यमांशी बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, प्रफुल पटेल (Praful Patel) आणि सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्याशी भेट झाली नाही. जर यांच्याशी भेट झाली असती तर मी नक्कीच सांगितलं असतं. कुठली चर्चा झाली नाही. विलीनीकरण वगैरे याची चर्चा होण्याचा संबंधच नाही. त्यांच्यासोबत कोणतीही विलीनीकरणांची चर्चा झाली नाही. अजितदादांच्या निधनानंतर अशी कुठली चर्चा नाही. त्यांच्या निधनानंतर ही चर्चा थांबली असल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर दुसरीकडे या भेटीदरम्यान मी ज्या हॉलमध्ये बसलो होतो तिथे कोणीही नव्हते असं देखील जयंत पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या निवसस्थानी सुनील तटकरेंशी भेट झाली नाही अशी माहिती देखील जयंत पाटील यांनी दिली.

जयंत पाटील नवे अर्थमंत्री होणार ?

या भेटीनंतर जयंत पाटील नवे अर्थमंत्री होणार असा प्रश्न देखील या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना विचारण्यात आला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, खाते वाटपाचा अधिकार मुख्मंत्र्यांचा असतो. जर आम्ही त्या पक्षात गेलो, तर अर्थमंत्री पद भेटेल पण आम्ही सर्व खासदार, आमदार शरद पवारांच्या पाठीशी एकसंघ आहोत. मात्र तरी देखील प्रसारमाध्यमांत यावर चर्चा होत असते याचा मला दुःख वाटते असं माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले.

follow us