Download App

भाजी विक्रेत्याची इच्छा, राहुल गांधींनी थेट जेवायलाच बोलावलं; लंच डिप्लोमसीचा ‘असा’ही किस्सा!

Rahul Gandhi : मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रामेश्वर नावाच्या भाजी विक्रेत्याचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. रामेश्वर (Rameshwar)भाजी मंडईत टोमॅटो घेण्यासाठी आला होता. मात्र भाव जास्त असल्याने टोमॅट काही खरेदी करता आले नाहीत. या व्हायरल व्हिडीओची चांगलीच चर्चा झाली होती. विरोधी पक्षांकडून सरकारवर टीकेची झोड उठलेली असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रामेश्वर यांनी दुपारच्या जेवणासाठी आपल्या घरी बोलावले होते.

‘भ्रष्टाचार, परिवारवाद अन् तुष्टीकरणाविरोधात लढणारच’; मोदींनी फुंकलं रणशिंग!

जुलै महिन्यात रामेश्वरचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांचा हा व्हिडीओ एका मुलाखतीतीचा भाग होता. त्यानंतर आणखी एका व्हिडीओत रामेश्वर म्हणाले होते की त्यांना राहुल गांधींना भेटण्याची इच्छा आहे. त्यानंतर राहुल गांधींनीही त्यांची इच्छा पूर्ण करत घरी जेवणासाठी बोलावले. त्यानंतर राहुल गांधी यांनी रामेश्वर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जे लोक विपरीत परिस्थितीतही हसतमुख असतात तेच भारताचे खरे भाग्यविधाते आहेत अशी कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले.

राहुल गांधी यांनी दिल्लीतील आझादपूर भाजी मंडईतील एका शेतकऱ्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडीओत भाजी विक्रेते रामेश्वरच्या यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. त्यातच ते टोमॅटो खूप महाग झाले आहेत. माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी टोमॅटो खरेदी करू शकेन. या टोमॅटोला किती भाव मिळेल याबाबत आम्हाला काहीच शाश्वती नाही. जर पावसाने हे खराब झाले तर आम्हाला नुकसानच सहन करावे लागेल. महागाईने हैराण करून सोडले आहे. त्यामुळे दिवसाकाठी 100-200 रुपये सुद्धा मिळत नाहीत, असे रामेश्वर या व्हिडीओत म्हणताना दिसत होते.

दरम्यान, सध्या पावसाळी परिस्थितीत टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे भाव प्रचंड वाढले आहेत. देशात काही ठिकाणी 200 तर काही ठिकाणी 100 रुपये किलो दराने विक्री होत आहे. अन्य वस्तूंचीही महागाई प्रचंड वाढली आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तर विरोधी पक्षही मोदी सरकारवर तुटून पडले आहे. टोमॅटोच्या किंमती अजूनही नियंत्रणात येत नसल्याने सरकारची मोठी कोंडी झाली आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असले तरी त्याला फारसे यश येताना दिसत आहे. किरकोळ आणि घाऊक महागाई दरात सातत्याने वाढ होत आहे.

Tags

follow us