‘भ्रष्टाचार, परिवारवाद अन् तुष्टीकरणाविरोधात लढणारच’; मोदींनी फुंकलं रणशिंग!

Narendra Modi Independance Day Speech : देशाचा स्वातंत्र्यदिन (Independance Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंत देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक नव्या योजनांची घोषणा केली.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या लोकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले. मी भ्रष्टाचाराविरोधात लढत राहणार. दुसरी गोष्ट म्हणजे परिवारवादाने देशाचे मोठे नुकसान केले. देशाला एक प्रकारे जखडून ठेवले आहे. देशातील लोकांचा हक्क हिरावला गेला. तुष्टीकरणाच्या राजकारणाने देशाच्या मुलभूत चिंतनाला, चरित्राला डाग लावला आहे. या तीन गोष्टींविरोधात लढायचे आहे. हीच मोदींची कमिटमेंट आहे.
Independance Day : ओबीसी समाजासाठी मोदींचं मोठं गिफ्ट; ‘विश्वकर्मा’ योजना सुरू करणार
विश्वकर्मा योजना सरकार सुरू करणार
मोदींनी आपल्या भाषणात विविध मुद्दे उपस्थित केले. मणिपुरातील हिंसाचार, पुढील एक हजार वर्षांवर, जी 20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची संधी, महागाई यांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. देशातील ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू करणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. या योजनेचा फायदा अनेकांना होईल. पारंपारिक कौशल्य असलेल्यांसाठी पुढील महिन्यात सरकार 13 हजार ते 15 हजार कोटी रुपयांच्या वाटपासह विश्वकर्मा योजना सुरू करेल, असे मोदी म्हणाले.
भारत आता 6G साठीही तयार
टेक्नॉलॉजी क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे. मागील वर्षात आपण 5G सुरू करण्यात आले होते. आता आपला देश 6G साठी देखील तयार आहे. यावर्षातील मार्च महिन्यातच 6G व्हिजन डॉक्यूमेंट लाँच करण्यात आले होते. यासोबत 6G रिसर्च अँड डेव्हलपमेंट टेस्ट बँड लाँच केलं होतं. या डॉक्युमेंट्सचा नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी फायदा होणार असल्याचे मोदी म्हणाले.
#WATCH live via ANI Multimedia | Independence Day 2023: PM Modi speech on 77th Independence Day of India | Red fort |https://t.co/nM9vgJ2J9w
— ANI (@ANI) August 15, 2023
25 हजार जनऔषधी केंद्रे सुरू करणार
पंतप्रधान मोदी म्हणाले, मी देशवासियांनी सांगू इच्छितो की देशभरात 10 हजार ते 25 हजार जनऔषधी केंद्रे सुरू होणार आहेत. येत्या 5 वर्षात देश 3 जागतिक अर्थव्यवस्थांपैकी एक असेल.
देशभरात 75 हजार सरोवरांचे काम सुरू
आम्ही खेळाडू्ंना विशेष प्रशिक्षण देत आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात 50 हजार अमृत सरोवरांची कल्पना केली होती. आज 75 हजार अमृत सरोवरे तयार करण्याचे काम देशात सुरू आहे. 18 हजार गावांना वीज पुरवठा करण्यासह अन्य महत्वाची उद्दीष्टे आपण वेळेआधीच पूर्ण करत आहोत. 200 कोटी लसीकरणाचे काम झाले आहे, असे मोदी म्हणाले.