Independance Day : ओबीसी समाजासाठी मोदींचं मोठं गिफ्ट; ‘विश्वकर्मा’ योजना सुरू करणार
Independance Day 2023 : देशाचा स्वातंत्र्यदिन (Independance Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंत देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक नव्या योजनांची घोषणा केली.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या लोकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले. मोदींनी आपल्या भाषणात विविध मुद्दे उपस्थित केले. मणिपुरातील हिंसाचार, पुढील एक हजार वर्षांवर, जी 20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची संधी, महागाई यांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. देशातील ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू करणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. या योजनेचा फायदा अनेकांना होईल. पारंपारिक कौशल्य असलेल्यांसाठी पुढील महिन्यात सरकार 13 हजार ते 15 हजार कोटी रुपयांच्या वाटपासह विश्वकर्मा योजना सुरू करेल, असे मोदी म्हणाले.
Independence day : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार देशाला संबोधित
या योजनेंतर्गत विविध वस्तू तयार करणाऱ्या आर्थिक मदत देण्यात येणार आहे. प्रशिक्षण, अनुदान आणि तांत्रिक सहाय्य देण्यात येणार आहे. विश्वकर्मा समाजांतर्गत 140 जाती येतात. या योजनेमळे 2024 च्या निवडणुकीत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसारख्या राज्यात याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यांसह मोदींनी आणखीही काही महत्वाच्या घोषणा भाषणात केल्या. देशातील दोन कोटी महिलांना लखपती बनविण्याचे उद्दीष्ट सरकारने निश्चित केल्याचे मोदी म्हणाले. तसेच देशातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अधिक तीव्र करणार असल्याचे मोदी म्हणाले. परिवारवाद आणि तुष्टीकरणाविरोधातील लढाई सुरूच राहणार असून देशातून या समस्यांना हद्दपार करणार असल्याचा निर्धार मोदींनी व्यक्त केला.
भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था
देशाला आगामी काळात देशाला जगात तीन नंबरची अर्थव्यवस्था करणारआहोत. त्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. देशाने अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे भारत हा जगातील टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये असेल असे मोदी म्हणाले.