Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi : काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना उपचारासाठी राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक निरीक्षण करत असून सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे. सौम्य तापाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. Congress Parliamentary Party Chairperson […]

Sonia Gandhi

Sonia Gandhi

Sonia Gandhi : काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना उपचारासाठी राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक निरीक्षण करत असून सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे. सौम्य तापाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

सोनिया गांधी (Sonia Gandhi) याआधी मार्च महिन्यात रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाल्या होत्या. यावेळीही त्यांना ताप होता. मात्र उपचारानंतर त्या ठणठणीत होऊन घरी परतल्या होत्या. मात्र त्यावेळीही एक दिवसानंतर जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये त्यांचा प्रकृती स्थिर असून त्या पूर्णपणे स्वस्थ असल्याचे सांगण्यात आले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. सौम्य तापाची लक्षणे दिसल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात आणण्यात आले. येथे त्यांच्यावर डॉक्टरांचे पथक उपचार करत असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केल्यापासूनच सोनिया गांधी (Sonia Gandhi) राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठीही त्या हजर होत्या. तसेच याआधी जुलै महिन्यात बंगळुरू येथे झालेल्या बैठकीसाठीही सोनिया गांधी उपस्थित होत्या. या बैठकीनंतर आघाडीची पुढील बैठक कुठे होणार?, या बैठकीत काही ठोस निर्णय घेतले जाणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

“सनातन धर्म डेंग्यू, मलेरियासारखा… तो नष्टच करायला हवा”; CM स्टॅलिन यांचे सुपुत्र अडचणीत

Exit mobile version