Download App

Dheeraj Sahu : तीन दिवसांत 300 कोटींचं घबाड; चौथ्या दिवशीही छापेमारी सुरुच

Congress MP Dheeraj Sahu : झारखंडमधील काँग्रेस खासदार धीरज साहू (Congress MP Dheeraj Sahu) यांच्यासह निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात कोट्यावधी रुपयांचं घबाड हाती लागलं आहे. आज चौथ्या दिवशीही छापेमारी सुरूच आहे. शुक्रवारी रांची येथी साहू यांचे घर आणि ओदिशा येथील ठिकाणांवर आयकर विभागाचे अधिकारी येऊन धडकले. या छापेमारीत आतापर्यंत 300 कोटी रुपये मिळून आले आहेत. या छापेमारीसंदर्भात खासदार साहू (Dheeraj Sahu) यांनी अजून काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

या कारवाईमुळे झारखंडच्या राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे. विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी झामुमो आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी आयकर अधिकाऱ्यांनी साहू यांच्या घरातून तीन सुटकेस जप्त केल्या. या बॅगांमध्ये दागिने होते, अशी माहिती आयकर सूत्रांकडून समजली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या छापेमारीत दागिने सापडल्याचं पहिल्यांदाच समोर आलं आहे. मात्र, याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती नाही.

झारखंड राज्यातील स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयकर अधिकाऱ्यांना बोलांगीर जिल्ह्यातील सुदापाडा येथे छाप्यात नोटांनी भरलेले 156 बॅग मिळाल्या. या बॅगांपैकी फक्त सहा ते सात बॅगांमधूल पैशांची मोजणी झाली आहे. ही छापेमारी संबलपूर, बोलांगीर, टिटिलागढ, सुंदरगढ, राउरकेला आणि भुवनेश्वर या ठिकाणी केल्याचे आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोण आहेत धीरज साहू ?

धीरज साहू हे मोठे उद्योगपती आहेत. यासोबतच ते मद्य निर्मिती कंपनी बलदेव साहू आणि ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित आहेत. आयकर विभागाने झारखंड, ओडिशा आणि बंगालमधील समूहाच्या 10 ठिकाणी छापे टाकले. बलदेव साहू कंपनीच्या बोलंगीर कार्यालयापासून 30 किमी अंतरावर असलेल्या सातपुडा कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकून 200 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

छाप्यादरम्यान, 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटा बंडलमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. एवढी मोठी रोकड सापडल्यानंतर आयकर विभागाच्या पथकाला मशिन वापरून नोटा मोजाव्या लागल्या आहेत. छाप्यानंतर पैशांच्या 157 बॅगमध्ये भरल्या नंतर बॅग कमी पडल्यावर नोटा बॅगमध्ये भरून ट्रकमध्ये टाकल्या आणि बँकेत नेल्या आहेत.

Tags

follow us