Congress : 500 च्या नोटा उधळणे काँग्रेस नेत्याला पडले महागात; न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश
FIR File Against Congress Leader D K Shivkumar : कर्नाटक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. कर्नाटकच्या 224 विधानसभा जागांसाठी निवडणूक रंगणार आहे. यासाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी रोजी निकाल लागणार आहे. यावेळेस कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात अडचणीमध्ये वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा 500 रुपयांचा नोटा उधळण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरुन आता ते अडचणीत आले आहेत. कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील बेनिवहल्ली येथे प्रजा ध्वनी यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रोड शो च्या वेळेस त्यांनी या 500 रुपयांच्या नोटा उधळल्या होत्या.
#WATCH | Karnataka Congress Chief DK Shivakumar was seen throwing Rs 500 currency notes on the artists near Bevinahalli in Mandya district during the ‘Praja Dhwani Yatra’ organized by Congress in Srirangapatna. (28.03) pic.twitter.com/aF2Lf0pksi
— ANI (@ANI) March 29, 2023
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर जोरदार आरोप करण्यात आले. यानंतर स्थानिक न्यायालयाने शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मांड्या येथील ग्रामीण पोलिसांनी शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे काँग्रेसचे चाणक्य मानले जाणारे डी. के. शिवकुमार हे चांगलेच अडचणीत आले आहेत.
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, डझनभर नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत दाखल
दरम्यान, यावेळेस कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असे बोलले जात आहे. सध्या कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला 115 ते 127 जागा मिळणार असा अंदाज एबीपी न्यूज व सी व्होटरने केलेल्या सर्व्हेत समोर आला आहे. तर भाजपला 60 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.