Download App

‘पक्ष संघटनेत बदल करणे आवश्यक’; दिल्लीत पराभवानंतर तारिक अन्वरांकडून कॉंग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह…

काँग्रेसला आपली राजकीय रणनीती स्पष्ट करण्याची गरज असून पक्षाच्या संघटनेत मूलभूत बदल करणे देखील आवश्यक आहे.

  • Written By: Last Updated:

Tariq Anwar On Congress : संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्‍या दिल्‍ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly elections भाजपने (BJP) आम आदमी पार्टीचा पराभव करत तब्‍बल २७ वर्षानंतर सत्ता काबीज केली. या निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी देखील प्रचंड निराशाजनक राहिली. दरम्यान, आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार तारिक अन्वर (Tariq Anwar) यांनी काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला.

मोठी बातमी, पुण्यातून माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण 

काँग्रेसला आपली राजकीय रणनीती स्पष्ट करण्याची गरज असून पक्षाच्या संघटनेत मूलभूत बदल करणे देखील आवश्यक आहे, असं सांगत अन्वर यांनी पक्ष नेतृत्वारच सवाल उपस्थित केलाय.

दिल्लीतील पक्षाच्या निराशाजनक कामगिरीबद्दल अन्वर यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, काँग्रेसला आपली राजकीय रणनीती आता स्पष्ट करावी लागेल. कॉंग्रेसला युतीचे राजकारण करायचंय की स्वबळावर लढायचे आहे? ठरवावे लागेल. तसेच पक्षाच्या संघटनेत देखील मूलभूत बदल करणे देखील आवश्यक आहे, असं अन्वर यांनी म्हटलं.

गोपीनाथ मुंडेंची लेक मिंधी नाही, गुंडाला गुंड अन् बंडाला बंड; पंकजा मुंडेंकडून पटोद्यातून समाचार 

दिल्लीतील कॉंग्रेच्या पराभवाचा परिणाम देशातील इतर राज्यांच्या राजकारणावरही होणार असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. काँग्रेसने दिल्लीत विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. मात्र, दिल्लीत पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. त्याचा फटका कॉंग्रसेला आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या जागा वाटपात बसण्याची शक्यता आहे.

आगामी काळात बिहार विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि आरजेडीची युती होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आरजेडी आणि कॉंग्रेसची ययुती झाल्यास आरजेडी काँग्रेसला कमी जागा देणार असल्याची चर्चा आहे.

 

follow us