गोपीनाथ मुंडेंची लेक मिंधी नाही, गुंडाला गुंड अन् बंडाला बंड; पंकजा मुंडे कुणावर कडाडल्या?
![गोपीनाथ मुंडेंची लेक मिंधी नाही, गुंडाला गुंड अन् बंडाला बंड; पंकजा मुंडे कुणावर कडाडल्या? गोपीनाथ मुंडेंची लेक मिंधी नाही, गुंडाला गुंड अन् बंडाला बंड; पंकजा मुंडे कुणावर कडाडल्या?](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2023/10/Pankaja-Munde-1_V_jpg--1280x720-4g.webp)
Pankaja Munde in Beed Clarification on Various statement : पंकजा मुंडे यांनी आपण मुंडेंची लेक आहोत त्यामुळे मी कुणाची मिंधी नाही. तसेच मी गुंडाला गुंड अन् बंडाला बंड आहे. असं म्हणत त्यांनी आपल्याचं विधानांवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्या आज बीडमध्ये गेल्या असताना महासांगवी, कवडवाडी ता.पाटोदा येथे श्री संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, पंचकुंडी महायज्ञ, श्री भगवान शंकर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी सर्वच मुद्द्यांना हात घालत टीकाकारांना उत्तर दिले.
Champions Trophy 2025 मध्ये बुमराह खेळणार का? ‘या’ दिवशी बीसीसीआय घेणार अंतिम निर्णय
यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपूर्वी मी भगवान गडावर उस तोड कामगारांशी बोलताना म्हणाले होते की, कोयते घासून ठेवा. माझ्या त्या विधानावरून मी गुंड असल्याचं अनेकांनी म्हटंल होतं. मी गुंड नाही. मात्र मी ते विधान केलं होतं कारण कोयते घासून ठेवा मात्र तोडायला लगेच जाऊ नका. मतदान करून जा. मात्र मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. तसेच गरिबाकडे बघण्याची माझी नजर ही पिल्लांकडे पक्षी बघतो तीच आहे.
ऑपरेशन टायगर! शिंदे गटाकडून MVAच्या आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण, ठाकरेंचे १० आमदारही जाणार?
तसेच त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडेंची लेक कुणाची मिंधी नाही. तुम्ही मला अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी, जिजाऊंचा फोटो दिलाय. त्यामुळे मी तसंच काम करते. कोणत्याच गोष्टी आपल्या बाजूने नसताना माणून तत्वाने जगत असतो. तत्व हाच आहार असतो. मी त्याच पद्धतीन काम करत असते.
तब्बल 90 हजार कोटी थकीत, सरकारी कंत्राटदार आक्रमक… थेट सरकारविरोधातच थोपटले दंड
तसेच यावेळी मुंडे यांनी कुंभ मेळ्याला जाऊन आलेल्यांना देखील टोला लगावला. त्या म्हणाल्या या बीड जिल्ह्यातीलच 25-50 लोक कुंभला जाऊन आले. आता ते पुढची पाप कारायसा रिकामे झाले का? असं त्या म्हणाल्या.