ऑपरेशन टायगर! शिंदे गटाकडून MVAच्या आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण, ठाकरेंचे १० आमदारही जाणार?

  • Written By: Published:
ऑपरेशन टायगर! शिंदे गटाकडून MVAच्या आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण, ठाकरेंचे १० आमदारही जाणार?

Maharashtra Politics : शिंदे गटाकडून ठाकरे गट (UBT) फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आलं. ठाकरे गटाचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. अशाचत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) आज ७८ आमदारांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलंय. विशेष म्हणजे, यातील २० आमदार महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आहेत.

तब्बल 90 हजार कोटी थकीत, सरकारी कंत्राटदार आक्रमक… थेट सरकारविरोधातच थोपटले दंड 

ठाकरे गटाच्या दहा आमदारांना निमंत्रण..
विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३३ जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीला फक्त ४९ जागा मिळाल्या. आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या दिल्लातील निवासस्थानी ७८ नवीन आमदारांना जेवणाचं निमंत्रण दिलंय. यामध्ये महाविकास आघाडीच्या २० आमदारांचा समावेश आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या १०, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ४ आणि काँग्रेसच्या ६ आमदारांना आवताण देण्यात आलंय. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतांनाच श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या २० आमदारांना निमंत्रण दिलंय.

विधानसभा सचिवालयाने पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या ७८ आमदारांसाठी दिल्लीत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. या प्रशिक्षण शाळेसाठी महाराष्ट्रातील सर्व नवनिवार्चित आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. हेच टायमिंग साधत श्रीकांत शिंदे यांनी नवोदित आमदारांसाठी आज रात्री दिल्लीतील घरी स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केलाय. त्यासाठी ७८ आमदारांना निमंत्रित करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीने आमदारांना निमंत्रण देण्यात आलंय. ठाकरेंचे खासदार, आमदार फुटणार आणि ते शिवसेनेत जाणार, अशी चर्चा सातत्याने सुरू आहे. त्यातच आता श्रीकांत शिंदेंनी ठाकरे सेनेच्या १० आमदारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलंय. त्यामुळे ऑपरेशन टायगरची चर्चाने आणखीच जोर धरला.

क्रिकेटच्या 54 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले हे, ‘या’ फलंदाजाने डेब्यू सामन्यातच केला विश्वविक्रम 

ठाकरेंचे आमदार शिंदेंच्या स्नेह भोजनाला जाणार?

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शत्रुत्व पाहता ठाकरेंचे १० आमदार स्नेहभोजनाला उपस्थित राहणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचा कोणताही नवनिर्वाचित आमदार या स्नेह भोजनासाठी जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. दिल्लीत पोहोचलेल्या अनेक आमदारांनी आपण या स्नेह भोजनाला जाणार नसल्याचं सांगितलं.

याआधी दिल्लीतील ६ जनपथवर शरद पवार यांच्या शासकीय निवासस्थानी सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रमांची निमंत्रण देण्यात यायची. आता हाच पॅटर्न शिंदे राबवताना दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube