Download App

दहशतवाद्यांकडे 300 किलो आरडीएक्स कुठून आले?, मलिकांच्या दाव्यानंतर काँग्रेसचा सवाल

Congress Question On Pulwama Attack: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी एका मुलाखतीत केलेल्या दाव्यानंतर पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या (Pulwama Attack) मुद्द्यावर काँग्रेसने मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. सीआरपीएफ जवानांना (CRPF jawan) विमान का नाकारण्यात आले, असा सवाल काँग्रेसने केंद्राला विचारला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तपासाच्या निकालाबाबतही काँग्रेसने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे.

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दावा केला आहे की, सीआरपीएफने गृह मंत्रालयाकडे जवानांची वाहतूक करण्यासाठी विमाने मागितली होती, ज्याला मंजुरी मिळाली नाही. मलिक यांच्या दाव्यानंतर काँग्रेस आक्रमक दिसत आहे. काँग्रेसने म्हटले की, दहशतवादी हल्ल्याचा धोका असूनही सैनिकांना रस्त्याने प्रवास करावा लागला.

Satya Pal Malik : IAS अधिकारी ते खळबळ उडवून देणारा नेता व्हाया राज्यपाल!

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर ‘किमान प्रशासन आणि कमाल मौन’ असल्याचा आरोप केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर काँग्रेस प्रश्न विचारत राहील, असे ते म्हणाले.

सत्यपाल मलिकांच्या गंभीर आरोपांनंतरही रान उठवणारं भाजप चिडीचुप्प?

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, सीआरपीएफ जवानाला विमान का नाकारले? त्यांना एअरलिफ्ट का करण्यात आले नाही?” त्या म्हणाल्या की जैश या दहशतवादी संघटनेच्या धमक्यांकडे का दुर्लक्ष करण्यात आले? श्रीनेत म्हणाल्या की 2 जानेवारी 2019 ते 13 फेब्रुवारी 2019 दरम्यान दहशतवादी हल्ल्यांच्या 11 गुप्तचर सूचनांकडे दुर्लक्ष का करण्यात आले? दहशतवाद्यांकडे 300 किलो आरडीएक्स कुठून आले?

श्रीनेत म्हणाल्या, “चार वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतर पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तपास कुठे पोहोचला आहे? NSA अजित डोवाल आणि तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांची जबाबदारी कुठे, कधी, कशी आणि कोण ठरवणार?

Tags

follow us