Download App

‘त्या’ दोन मोदींना भारतात आणा, तुमचे आम्हीही स्वागत करू; काँग्रेस नेत्याचा पंतप्रधानांना खोचक टोला

Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत केले. त्यांच्या या स्वागतावर विरोधी पक्ष काँग्रेसने खोचक टीका केली आहे. काँग्रेसने म्हटले की सरकारने देशातून पळून गेलेल्या नीरव मोदी आणि ललित मोदी यांना जर सरकारने परत आणले तर काँग्रेसचे नेते सुद्धा पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उभे असतील.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले, की आम्ही सुद्धा स्वागत करू पण जर अन्य मोदींना देशात आणले तरच. दर ललित मोदी अथवा नीरव मोदी यांना जर सरकारने परत देशात आणले तर आम्ही सुद्धा दिल्लीतील विमानतळावर उभे राहू आणि भव्य स्वागत करू.

नोटबंदी 2.0 नंतर मोदीचं देशवासियांना गिफ्ट; आता खिशात येणार नवी संसद

जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर मोदींचे विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावर खेडा यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

खेडा यांनी काही बातम्यांचा हवाला देत म्हटले, की मोदी परत आल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एका विश्वविद्यालयाने पाच राज्यांच्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यावर बंदीची घोषणा केली. हीच प्रधानमंत्र्यांची कामगिरी आहे का ते विमानतळावरून घरी येत नाही तोच ही बातमी आली. जेव्हा केव्हा पंतप्रधान बाहेर जातात त्यावेळी ते देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यांची पहिली जबाबदारी भारताच्या हितांचे संरक्षण करणे ही आहे.

Video : पंतप्रधान मोदींच्या 9 योजनांनी बदललं देशाचं चित्र

ऑस्ट्रेलिया सरकारच्या या निर्णयानंतर तुम्ही काय कार्यवाही केली, भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात असताना या महत्वाच्या प्रश्नावर चर्चा कधी होणार, असे सवाल खेडा यांनी उपस्थित केले. काँग्रेसचे सरकार ज्यावेळी सत्तेत होते तेव्हा सरकारांमध्ये संवेदनशीलता होती. या सरकारमध्ये तसेच या सरकारमधील कोणत्याही व्यक्तीत थोडीही संवेदना दिसत नाही, अशी टीका खेडा यांनी केली.

Tags

follow us