नोटबंदी 2.0 नंतर मोदीचं देशवासियांना गिफ्ट; आता खिशात येणार नवी संसद

  • Written By: Published:
नोटबंदी 2.0 नंतर मोदीचं देशवासियांना गिफ्ट; आता खिशात येणार नवी संसद

Ministry of Finance Launch Special Rs 75 Coin : एकीकडे दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. तर, दुसरीकडे नव्या संसदेच्या उद्घटनावरूनदेखील वादाला तोंड फुटलेले असतानाच आता मोदी सरकारकडून देशाची नवी संसद नागरिकांना खिशात घेऊन फिरता येणार आहे. येत्या 28 मे रोजी नव्या संसदेच्या उद्धटनाप्रसंगी मोदी सरकारकडून 75 रुपयांचे अनोखे नाणे लाँच केले जाणार आहे. यासाठी वित्त मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये नवीन संसद भवनाचे लोकार्पण संस्मरणीय बनवण्यासाठी सरकारकडून 75 रुपयांचे नाणे आणणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Ministry of Finance Launch Special Rs 75 Coin)

‘मी महाराष्ट्रातच बरा पण, लोकसभेची जबाबदारी दिली तर’.. केसरकरांनी टाकली गुगली

खास आहे 75 रुपयांचे नाणे

मोदी सरकारकडून लाँच करण्यात येणारे नाणे त्याच्या डिझाईनमुळे बाजारात येण्यापूर्वीच चर्चेत आले आहे. नवीन संसद भवनाची रचना त्रिकोणी आहे. अशा स्थितीत या नाण्याचे स्वरूपही त्यासारखेच असण्याची शक्यता आहे. संसद भवनाच्या लॉन्चिंगवेळी जारी करण्यात येणारे 75 रुपयांचे नाणे 35 ग्रॅमचे असेल. त्यात 50% चांदी आणि 40% तांबे असेल. याव्यतिरिक्त 5% झिंक आणि निकेल यांचेदेखील मिश्रण असणार आहे. म्हणजेच हे नाणे चार धातू मिश्रित असे असणार आहे.

नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ असेल, तर, खालील बाजूस रुपयाचे मूल्य म्हणजे 75 रुपये लिहिलेले असेल.
नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे डिझाईन बनवले जाणार असून, त्याच्या वर आणि खाली संसद परिसर असे लिहिलेले असेल. यासोबतच नाण्याच्या खालच्या बाजूला 2023 छापण्याचे वर्ष लिहिलेले असेल.

Nitesh Rane : ‘मविआचं दुकान बंद होणार?’ उध्दव ठाकरेंच्या आमदारांचा ‘तो’ Video व्हायरल

कशी आहे नवी संसदेची रचना

संसदेची नवीन इमारत त्रिकोणी आकाराची आहे. याठिकाणी बसण्यासाठी एकूण 888 जागांची सोय करण्यात आली आहे. तर, अभ्यागतांच्या गॅलरीत 336 पेक्षा जास्त लोक बसू शकणार आहेत. याशिवाय संसद भवनात राज्यसभेच्या 384 खुर्च्या असून, नव्यान उभारण्यात येणारे संसद भवन तांत्रिक सुविधांनी सुसज्ज आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube