‘मी महाराष्ट्रातच बरा पण, लोकसभेची जबाबदारी दिली तर’.. केसरकरांनी टाकली गुगली
Deepak Kesarkar on Lok Sabha Election : देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभेला कोण इच्छुक आहे कुणाला तिकीट मिळणार याचे अंदाज बांधले जात आहेत. त्यातच आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचेही नाव समोर येत आहेत. याबाबत केसरकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
केसरकर यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांनी लोकसभेचे जागावाटप आणि त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला. लोकसभा निवडणुकीसाठी मी स्वतः इच्छुक नाही. पण, कुणीतरी जबाबदारी दिली तर घ्यावीच लागते. पक्षाने जबाबदारी दिली तर घ्यावीच लागते. पण मला जर विचाराल तर मला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रासाठी काम करायला आवडतं.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदाभाऊ खोत यांची ‘वारी शेतकऱ्याची’ पदयात्रा…
शिंदे गट आणि भाजप यांच्यात लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाल्याचे समजते. शिंदे गटाने भाजपकडे 22 जागांचीही मागणी केल्याची माहिती आहे. यावर केसरकर म्हणाले, याबाबतचे सर्व निर्णय हे वरिष्ठ घेत असतात याबाबत मी बोलणं बरोबर नाही. मात्र नवीन रक्ताला संधी द्यायची भूमिका घ्यायची असेल तर चांगली गोष्ट आहे, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत शिंदे गट आणि भाजप यांच्यात चर्चा सुरू असल्याचे समजते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्याही अटकळी बांधल्या जात आहे.
लोकसभा निवडणुकीत कुणाला तिकीट मिळणार याबाबत अजून काहीच ठरलेले नाही. आगामी राजकीय घडामोडींवर ते अवलंबून असणार आहे. तरी देखील आतापासूनच दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. अनेक नेत्यांची नावे समोर येऊ लागली आहेत. अशात आता जागावाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात तसेच कुणाला तिकीट मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Nitesh Rane : ‘मविआचं दुकान बंद होणार?’ उध्दव ठाकरेंच्या आमदारांचा ‘तो’ Video व्हायरल