Nitesh Rane : ‘मविआचं दुकान बंद होणार?’ उध्दव ठाकरेंच्या आमदारांचा ‘तो’ Video व्हायरल

Nitesh Rane : ‘मविआचं दुकान बंद होणार?’ उध्दव ठाकरेंच्या आमदारांचा ‘तो’ Video व्हायरल

Nitesh Rane On UBT MLAs Video : महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद, आगामी निवडणुकांच्या जागा वाटपावरून सुरू असलेली तूतू मैंमैं. त्याचबरोबर मविआच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात केलेली वक्तव्ये यावरून आगामी काळात महाविकास आघाडी टीकणार की तुटणार असा प्रश्न विचारला जात आहे. यामध्ये कधी नाना पटोले, कधी अजित पवार आणि संजय राऊत, कधी अजित पवार आणि सुषमा अंधारे तर कधी स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत.

Nana Patole : महाराष्ट्रातील ‘सिद्धू’ला हटवा : कॉंग्रेस नेते दिल्लीत; पक्षाध्यक्षांचीही घेतली भेट

यामध्येच आता उद्धव ठाकरेंच्या काही आमदारांच्या एका व्हायरल व्हिडीओने खळबळ माजली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ठाकरे गटाचे काही आमदार गप्पा मारताना दिसत आहेत. यामध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अनिल परब, हे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले यांची त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा कोणाला न विचारता दिल्याच्या मुद्द्यावरून खिल्ली उडवताना दिसत आहेत.

तसेच ते असं देखील म्हणत आहेत. की आम्ही देखील त्यांच्याकडून काही तरी शिकलो आहोत. तर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे रामदास कदमांच्या नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर जी प्रतिक्रिया दिली होती त्याची देखील दानवेंनी चेष्टा केली. या सगळ्या आमदारांची ही ऑफ द कॅमेरा अनौपचारिक चर्चा व्हायरल झाल्याने मात्र खळबळ उडाली आहे.

Gajanan Maharaj : संत गजानन महाराज पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान, शेगाव नगरी दुमदुमली

दरम्यान हा व्हिडीओ भाजप नेते नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्यांनी ठाकरे आणि त्यांच्या आमदारांना टोला लागवला आहे. राणे म्हणाले, ‘काल हा video mute करुन दाखवा असे channels ना सांगितले गेले.. उध्दव ठाकरेंचे शिल्लक आमदार नाना पटोलेंची फिरकी घेत आहेत.. किती serious आहेत case बद्दल.. किती ती निष्ठा उध्दवजींवर !!! हिच ती वेळ..उरलेल दुकान बंद करण्याची !!’ अशी टीका राणेंनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube