नवी दिल्ली : पूर्वेकडील भारतीय चिनी लोकांसारखे तर, दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं असून, ऐन निवडणुकांच्या धामधुमीत पित्रोदा यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या असून, या विधानामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण आणि पूर्वेकडे काँग्रेसचा बाजार उठणार हे निश्चित मानले जात आहे. ‘द स्टेट्समन’ला दिलेल्या मुलाखतीत सॅम पित्रोदा यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. (Sam Pitroda Controversial Statement On indian People Colors )
आजच्या विधानापूर्वी काहीदिवसांपूर्वी पित्रोदा यांनी वारसाकराबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर काँग्रेसला स्पष्टीकरण द्यावे लागले होते. तो वाद शांत होत नाही तोच आता पित्रोदांनी पुन्हा भारतीयांच्या दिसण्यावरून वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर भाजपला टीका करण्यासाठी हाती आयतं कोलित मिळालं असून, काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
"तोडा फोडा आणि राज्य करा ही काँग्रेसची नीती राहिली आहे…
काँग्रेस नेते म्हणत आहे की…
दक्षिण भारतील लोक आफ्रिकन, ईशान्य भारतातील लोक चायनीज, पश्चिम भारतातील लोक अरबी आणि उत्तर भारतातील लोक गोरे दिसतात अशा वर्णभेद करणाऱ्या काँग्रेसी मानसिकतेमुळे भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीला… pic.twitter.com/qSbaxVuRY5— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 8, 2024
काय म्हणाले आहेत पित्रोदा?
‘द स्टेट्समन’ला दिलेल्या मुलाखतीत पित्रोदा भारतातील विविधतेबद्दल बोलत होते. त्यावेळी त्यांनी पूर्वेकडील लोक चीनसारखे, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे आणि उत्तरेकडील लोक बहुधा गोऱ्यांसारखे आणि दक्षिणेकडील लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात असे सांगितले. पित्रोदा यांच्या या विधानानंतर एकीकडे राजकारण तापलेले असताना काँग्रेसने मात्र या विधानावर काँग्रेसच्या नेत्यांनी कोणताही बाजू घेतल्याचे दिसून येत नाहीये. याबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी पित्रोदा यांनी भारताची विविधता दाखवण्यासाठी केलेली तुलना अत्यंत दुर्दैवी आणि अस्वीकार्य असून, काँग्रेस पक्ष पित्रोदा यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे.
The analogies drawn by Mr. Sam Pitroda in a podcast to illustrate India's diversity are most unfortunate and unacceptable. The Indian National Congress completely dissociates itself from these analogies.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) May 8, 2024
पित्रोदांच्या विधानावर भाजपनं संधी साधली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र भाजपनं संधी साधत टीका करण्याची संधी साधली आहे. याबाबत पित्रोदांचा व्हिडिओ ट्विट करत “तोडा फोडा आणि राज्य करा ही काँग्रेसची नीती राहिली असल्याचे भाजपनं म्हटले आहे. तसेच काँग्रेस नेते म्हणत आहे की… दक्षिण भारतील लोक आफ्रिकन, ईशान्य भारतातील लोक चायनीज, पश्चिम भारतातील लोक अरबी आणि उत्तर भारतातील लोक गोरे दिसतात अशा वर्णभेद करणाऱ्या काँग्रेसी मानसिकतेमुळे भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीला आव्हान देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. एका बाजूला नरेंद्र मोदीजी “वसुधैव कुटुंबकम्” म्हणत भारतीय संस्कृतीचा जागर करतात मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेस देशातीलच नागरिकांना वर्णभेद करून विभागण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्ष देशाच्या अखंडतेला आणि अस्मितेला धोकादायक आहे हे पुन्हा दिसून आले.