Video : आता कोयता गँग, खंडणीखोरी, गुन्हेगारीच्या टोळ्या असे पुण्याची प्रतिमा; काँग्रेसचे युवा उमेदवार ऋषीकेश जाधवांचा आरोप

मी उच्च शिक्षित आहे. मला काय कराव आणि काय नाही असं कळत. त्यामुळे जनतेने आता तरुणांना प्राध्यान्य दायला हवं असं मतही त्यांनी मांडलं.

News Photo   2026 01 04T162133.163

आज पुण्याची ओळख बदललेली आहे. (Pune) पुण्याची सांस्कृतीक राजधानी अशी ओळख होती. ती आता कोयता गँग, खंडणीखोरी, गुन्हेगारीच्या टोळ्या अशा वातावरणात पुणे शहर आहे. परंतु, या मुलांच्या हातात ही कोयता, कट्टा बंदूक कोण देतं हाच खरा प्रश्न आहे अस म्हणत हे चित्र बदललं पाहिजे असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्व जातीधर्म एक होत्या त्या आता कशा विभागल्या. आपण सर्व भारतीय आहोत बाकी नाही असं मत पुणे प्रभाग 12 मधून काँग्रेस उमेदवार ऋषीकेस जाधव म्हणाले ते लेट्सअपवर बोलत होते.

यावेळी भाजपने प्रभाग रचना ही भाजपने मुद्दाम त्यांना सोईचा केलेला आहे. त्यांनी तसं केलं असलं तरी आम्ही असं होऊ देणार नाहीत असंही ते म्हणाले. लोकांसाठी आम्ही काम करतो आणि मी लोकांना भेटणारही आहे. त्यामुळे हे लोक कितीही प्रयत्न केला तरी मी लढणार आहे. तसंच, काँग्रेसने काय केलं असा प्रश्न विचारला जातो पण सर्व काँग्रेसनेच केलं. अनेक योजना आहेत ज्याचा फायदा आजही लोकांना होतो. हे लोक फक्त योजनांची नाव बदलतात त्यापलीकडं काही नाही असंही ते म्हणाले.

पात्रता नसताना निवडणूक लढवणं म्हणजे घराणेशाही; गिरीराज सावंत यांनी स्पष्टचं सांगितलं

मी उच्च शिक्षित आहे. मला काय कराव आणि काय नाही असं कळत. त्यामुळे जनतेने आता तरुणांना प्राध्यान्य दायला हवं असं मतही त्यांनी मांडलं. कारण अनेकदा हा तरुण आहे याला काय कळतय असं बोललं जात. हो संगळ थांबलं पाहिजे असंही जाधव म्हणाले. मला लोकांच्या प्रश्नांविषयी तळमळ आहे, त्याच तळमळीने मला आता लोकांसाठी काम करायचे आहे. कारण आजही अनेक ठिकाणी साधा रस्ताही व्यवस्थित नाही असंही ते म्हणाले.

काँग्रेस पक्षात कोण तुमचं आदर्श आहे असं विचारल्यावर ते म्हणाले, माझे आदर्श राहुल गांधी आहेत. कारण इतरी मोठी भाजपसारखी शक्ती समोरून लढत असताना तो माणूस एकटा लढत आहे. त्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही ते एकटे आपल्या विचारांनी लढतात. तेच त्यांचे विचार मला कायम प्रेरणा देत राहतात आणि त्याच प्रेरणेने मी काम करणार आहे असंही ते यावेळी म्हणाले.

follow us