Download App

स्वातंत्र्यदिनी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट, सुरक्षा वाढवली

Independence Day : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, संशयास्पद हालचाली आणि संशयितांवर सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे. तर ठिकठिकाणी तपास आणि सखोल शोधही सुरू आहे. त्याचवेळी लाल किल्ल्याच्या भोवती तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. जमीन, आकाश आणि यमुना नदीच्या मार्गाने होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखी कडक करण्यात आली आहे.

मात्र दरम्यान, सुरक्षा यंत्रणांना गुप्त माहिती मिळाल्याने सर्व यंत्रणांनी कारवाईला सुरुवात केली आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक दक्ष राहून स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.

ISI च्या सहकार्याने खलिस्तानी समर्थकांकडून दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला होण्याची माहिती इंटेलिजन्स ब्युरो (IB)ला मिळाली आहे. यानंतर IB ने तात्काळ एनसीआरच्या सर्व पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याच्या आणि सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयबीकडून सतर्कतेचा इशारा मिळाल्यानंतर दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी पोलिस मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून त्यांना राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना दिल्या.

Pune News : भिडेंना अटक करा, अन्यथा मंत्र्यांना झेंडावंदन.., संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर, विशेषत: नवी दिल्ली, मध्य आणि उत्तर दिल्लीतील सर्व मार्गांवर पॅरा मिलिटरी फोर्स आणि पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. ज्या मार्गांवरून पंतप्रधान आणि इतर सर्व व्हीव्हीआयपी त्यांच्या निवासस्थानापासून लाल किल्ल्यावर जातील आणि त्यानंतर परततील त्या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. लाल किल्ला यापूर्वीच एनएसजी, एसपीजी आणि लष्कराने ताब्यात घेतला आहे.

Tags

follow us