Coromandel Express Accident : कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला आहे. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. शोध व बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक होऊन कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ED Raid : पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर ईडीची छापेमारी !, 18 कोटींवर टाच
या अपघातामध्ये तीनशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. तर 50 हून अधिक प्रवासांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमीतील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काही प्रवासी रेल्वे डब्ब्यांमध्ये अडकले असून, बचाव कार्य सुरू आहे.
Odisha | An Express Train met with an accident near Bahanaga railway station in Balasore district. Teams have left for the spot for search and rescue operation. Collector, Balasore has also been directed to reach the spot to make all necessary arrangements and intimate the SRC if… pic.twitter.com/N4AGWQVKkX
— ANI (@ANI) June 2, 2023
कोरोमंडल एक्स्प्रेस ही कोलकाता येथून चेन्नईला जात होती. तर मालगाडी ही बेंगळुरू येथून कोलकाता येथे जात होती. या दोन्ही रेल्वे गाड्यासमोर समोरासमोर आल्याने मोठा अपघात झाला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे.
बचावासाठी एनडीआरएफचे शंभर जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.प्रवाशांच्या नातेवाईकांच्या संपर्कासाठी सहा हेल्पलाइन नंबर रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहेत.
बालासोरच्या जिल्हाधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन्ही रेल्वे गाड्यासमोरासमोर कशा आल्या आहेत, याची चौकशी रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली आहे.
दरम्यान या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून पुढील सूचना दिलेल्या आहेत. मोदी यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.