Covid In India: देशात पुन्हा एकदा कोरोना वाढत आहे. सध्या देशात कोरोनाचे 1000 पेक्षा जास्त रुग्ण (Covid In India) असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. देशात वाढत असणाऱ्या कोरोनामुळे आता आरोग्य विभाग देखील सतर्क झाले असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहे. सध्या देशात सर्वात जास्त कोरोना रुग्ण (Corona Patient) केरळमध्ये (Kerala) असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
देशात 3 वर्षांनंतर कोरोनाचे 1000 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आढळून आले आहे. यापूर्वी देशात मार्च 2022 मध्ये 1000 पेक्षा जास्त कोरोनाचे सक्रीय रुग्ण आढळून आले होते. अचानक देशात कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत आहे.
केरळ कोरोना सेंटर
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहे. केरळमध्ये सध्या 430 सक्रिय रुग्ण आहे तर महाराष्ट्रात (Maharashtra) 209, दिल्लीत 104 आणि उत्तर प्रदेशात 15 रुग्ण आढळून आले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 12, गुजरातमध्ये 83 आणि कर्नाटकमध्ये 47 सक्रिय रुग्ण आहेत. तर दुसरीकडे आता मध्य प्रदेशात देखील कोरोना रुग्ण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.
At 08:00 Hours, 26th May, the number of active COVID-19 cases in India stands at 1009: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/ljFIsucOof
— ANI (@ANI) May 26, 2025
माहितीनुसार, गेल्या तीन दिवसात मध्य प्रदेशात 4 कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत 11 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 11 पैकी पाच जण इंदूरचे स्थानिक रहिवासी आहेत.
राजधानी दिल्लीत नवीन कोरोना स्ट्रोन
देशाची राजधानी दिल्लीत देखील कोरोना वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर दिल्लीत कोरोनाच्या दोन नवीन स्ट्रोनची देखील पुष्टी करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसात दिल्लीत 99 कोरोना रुग्ण आढळून आले आहे.
कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशामध्येही कोरोना
देशाती राजधानी दिल्लीसह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये देखील आता कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत आहे. कोरोनामुळे कर्नाटकामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून आता देखील कर्नाटकामध्ये 47 सक्रिय रुग्ण आहे. तर दुसरीकडे आंध्रा प्रदेशात 4 सक्रिय रुग्ण आहे. तर उत्तर प्रदेशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 15 आहे.
ग्राम चिकित्सालय अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूरने शेअर केली अरुणाभ कुमारसोबत BTS फोटो अन्…
राजस्थानमध्ये 13 रुग्ण आढळले आहेत आणि पश्चिम बंगालमध्येही कोविडचे 12 सक्रिय रुग्ण आहेत. याशिवाय मध्य प्रदेशात 2, छत्तीसगडमध्ये 1, गोव्यात 1 आणि तेलंगणामध्ये 1 रुग्ण आढळला आहे.