मुंबई : मागील गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा (Corona) संसर्ग कमी झाला होता. प्रशासनाने राबवलेल्या अनेक धोरणांमुळे राज्यासह देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता केंद्र सरकारने (Central Govt) नागरिकांना पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
देशात सध्या 10 हजार 300 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. महाराष्ट्रात आज नवीन 694 कोविड प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यामुळं राज्याच्या दैनंदिन कोविड प्रकरणांमध्ये 63% वाढली आहे. बुधवारी राज्यात 483 प्रकरणे नोंदवली गेली. मात्र, मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यात 3,016 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या वेळी राज्यात 27 ऑक्टोबर रोजी 972 प्रकरणे इतकी उच्च संख्या नोंदवली गेली होती. तर चार आठवड्यांपूर्वी, राज्यात पॉझिटीव्हिटी दर 1.05 टक्के होता. परंतु 22 ते 28 मार्च दरम्यान तो 6.15 टक्के नोंदवला गेला. पॉझिटीव्हिटी दर 100 चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह केसेसची संख्या दर्शवते.
मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये कोविड प्रकरणांची नोंद सर्वाधिक आहे. दरम्यान कोरोना रुग्णांचा संख्या वाढत असतांना प्रशानसान सतर्क झाले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात नुसता घोषणांचा सुळसुळाट, मात्र पैसा कोठून आणणार?
पुण्यासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थिती आवाक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जमणे टाळण्याचे आवाहन केले आहे आणि संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी मास्क वापरण्याचे देखील आवाहन केले आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गाइड्सलाईनमध्ये सांगितलं की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यात ताबडतोब वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी अद्ययावत केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकाच दिवसात 3,016 ताज्या कोरोनाव्हायरस प्रकरणांची वाढ झाली, जे जवळपास सहा महिन्यांतील सर्वाधिक आहे, तर सक्रिय प्रकरणे 13,509 पर्यंत वाढली आहेत.