Download App

Covid 19 : कोरोना रुग्णांमध्ये वाढ! कर्नाटक सरकार सतर्क, ज्येष्ठांना मास्क लावण्याचा सल्ला

Corona Virus : कोरोनाच्या (Covid 19)वाढत्या रुग्णांनंतर कर्नाटकमध्ये (Karnataka )अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ (Kerala)आणि इतर राज्यांमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने कर्नाटक सरकारने आजारी ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचा सल्ला (Advice on wearing a mask)दिला आहे. देशात गेल्या 24 तासात कोविडचे 300 नवीन रुग्ण आढळले आहेत. संसर्गामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार रुग्ण फक्त केरळमधील, तर एक उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)आहे.

सलीम कुत्ता प्रकरणात गिरीश महाजनांचं नाव, सभागृहात खडाजंगी, निलम गोऱ्हेंची परब, जगतापांना तंबी

केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांनी राज्य सरकारवर कोविड-19 च्या नवीन प्रकार JN.1 चा प्रसार रोखण्यासाठी कोणतीही पावलं न उचलल्याचा आरोप केला. सतीशन यांनी पत्रकारांना सांगितले की, देशातील 89 टक्के कोविड प्रकरणं याच राज्यात आहेत. तरीही केरळ सरकारने या संदर्भात काय कारवाई केली? याबद्दल त्यांनी कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.

CM Shinde : गडचिरोलीतील नक्षल पिडीत, शरणार्थींसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रविवारी भारतात 335 नवीन कोविड प्रकरणं नोंदवली आहेत. त्यानंतर सक्रिय प्रकरणांची संख्या 1,701 झाली आहे. दरम्यान, केरळमध्येही कोरोनाचा नवीन सबव्हेरियंट JN.1 समोर आला आहे.

पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. 8 डिसेंबरला, केरळमध्ये कोविड-19 चा उप-प्रकार JN.1 चे रुग्ण समोर आली आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितल्यानुसार, 79 वर्षीय महिलेच्या आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल 18 नोव्हेंबर रोजी आला होता.

त्यामध्ये इन्फ्लूएंझासारख्या आजाराची सौम्य लक्षणं होती आणि ती कोविड-19 मधून बरी झाली आहे. यापूर्वी, सिंगापूरहून परतलेल्या तामिळनाडूतील एका व्यक्तीमध्येही JN.1 उप-प्रकार आढळून आला होता. हा माणूस तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी आहे. 25 ऑक्टोबर रोजी तो सिंगापूरला गेला होता.

Tags

follow us