Covid-19 : चाचणी-ट्रॅक-ट्रीटमेंट-लसीकरण अवलंबण्याचे राज्यांना आदेश!

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने घालून दिलेले कोरोना नियमांचे काटेकोर पालन प्रत्येक राज्यांनी करावे. त्यासंदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्यांना कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी चाचणी-ट्रॅक-ट्रीट-लसीकरणाच्या धोरणावर लक्ष केंद्रित करून  सुरू ठेवावे, असा सल्ला देखील दिला आहे. इन्फ्लूएंझा आणि कोविड-१९ […]

Corona Update Maharashtra

Corona Update Maharashtra

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने घालून दिलेले कोरोना नियमांचे काटेकोर पालन प्रत्येक राज्यांनी करावे. त्यासंदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्यांना कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी चाचणी-ट्रॅक-ट्रीट-लसीकरणाच्या धोरणावर लक्ष केंद्रित करून  सुरू ठेवावे, असा सल्ला देखील दिला आहे.

इन्फ्लूएंझा आणि कोविड-१९ साठी उपचारासाठी राज्यांनी आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्यांना आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. तसेच याशिवाय राज्यांना पुरेशा नियुक्त बेड्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्ध ठेवण्यास सांगितले आहे.

संपूर्ण देशभर गुरुवारी १३०० नवीन कोरोनाबाधित सापडले आहे. ही वाढ गेल्या १४० दिवसांत सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. सध्या देशात ७६०५ इतके सक्रिय रुग्ण संख्या आहे.

कोविड-१९ रुग्णांची एकूण संख्या आता ४ कोटी ४६ लाख ९९ हजार ४१८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मृतांची संख्या ५ लाख ३० हजार ८१६ वर पोहोचली आहे, अशी आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली.

Chandrashekhar Bavankule : मोदींना चोर म्हणणाऱ्या गांधींना ‘ओबीसी’ माफ करणार नाही!

भारतात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये दररोज वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी (दि. २३) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना “कोविड-चाचणी, ट्रॅक, उपचार, अनुसरण” या पाच पट धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा  सल्ला देखील दिला आहे.

कोविड-१९ची तयारी पाहण्यासाठी आम्ही आणखी एक मॉक ड्रिल करणार आहे. त्यामुळे लवकरच सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार आहे, असे केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

Exit mobile version