Chandrashekhar Bavankule : मोदींना चोर म्हणणाऱ्या गांधींना ‘ओबीसी’ माफ करणार नाही!

  • Written By: Published:
Rahul Gandhi Narendra Modi

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणणे हा संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचा अपमान आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांच्या विषयीचे वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे. त्यामुळे देशातील इतर मागास वर्ग (ओबीसी) हा येणाऱ्या काळात राहुल गांधी आणि त्यांच्या बगलबच्चे यांना माफ करणार नाही. तसेच त्यांना धडा शिकवेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आपल्या विरोधात निर्णय गेल्यावर केकाँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकं बिथरल्या सारखे करत्यात. लगेच लोकशाहीची हत्या झाली म्हणून गळे काढतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी आज देखील गुजरातच्या न्यायालयाने जेव्हा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी विरोधात निकाल दिला. त्यामुळे लगेच राहुल गांधी आणि बगलबच्चे लगेच अपमानास्पद बोलायला लागले.

Imtiaz Jaleel : राज ठाकरेंना मोठे करण्यासाठी भाजपचाच डाव!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विरोधात सातत्याने राहुल गांधी हे वक्तव्य करत आहेत. त्यांची वक्तव्य अत्यंत खालच्या पातळीवरचे असतात. त्याबाबत ते कधीही माफी मागत नाही. त्यामुळे यापुढे आम्ही राहुल गांधी आणि त्यांच्या बगलबच्चेना जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशाराच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांना या देशातील माफ करणार नाही. तसेच त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आता राहुल गांधी यांच्या विरोधात महाराष्ट्रभर निषेध आंदोलन करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube