Download App

सावधान, सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाची लाट, भारतात नवीन व्हेरियंटची एंट्री 

Covid-19: गेल्या काही दिवसांपासून जगातील काही देशात कोरोनामुळे धाकधूक वाढली आहे. अनेक देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लोकांना

Covid-19:  गेल्या काही दिवसांपासून जगातील काही देशात कोरोनामुळे (Corona) धाकधूक वाढली आहे. अनेक देशात कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) वाढत असल्याने पुन्हा एकदा लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा आणखी एक नवीन व्हेरियंट सापडला आहे. ज्याला FLiRT असे नाव देण्यात आले आहे.

सिंगापूर आणि अमेरिकेमध्ये या नवीन व्हेरियंटचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. सिंगापूरमध्ये काही दिवसातच कोरोनाचे 25 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने  पुन्हा एकदा लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.

माहितीनुसार, जगात सध्या कोरोनाचे  JN.1 आणि त्याचे सब-व्हेरियंट, ज्यात KP.1 आणि KP.2 यांचा समावेश आहे यांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. सिंगापूरमध्ये सध्या KP.1 आणि KP.2 चे अधिक रुग्ण समोर येत आहे तर यूएसमध्ये 14 ते 27 एप्रिल दरम्यान KP.2 सब- व्हेरियंट रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

हा नवीन व्हेरियंट कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंट सारखा आहे, जो लोकांना वेगाने संक्रमित करू शकतो. नवीन व्हेरियंट FLiRT  चे KP.1.1 आणि KP.2 हे दोन सब व्हेरियंट आहे. दोन आठवड्यांच्या कालावधीत, या नवीन व्हेरियंटमुळे संसर्गाच्या प्रकरणांमध्ये खूप वेगाने वाढ नोंदवली जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुन्हा एकदा सिंगापूरमध्ये कोरोनाची नवीन लाट आली आहे.  5 ते 11 मे दरम्यान,  सिंगापूरमध्ये कोरोनाचे तब्बल 25,900 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यामुळे आरोग्य मंत्री ओंग ये कुंग यांनी पुन्हा एकदा जनतेला मास्क घालण्याचे आवाहन केले.

‘आप’ला अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंडमधून कोट्यवधी रुपयांचा बेकायदेशीर निधी, ईडीचा गृहमंत्रालयाला अहवाल

तर  दुसरीकडे, भारतात देखील FLiRT  या नवीन व्हेरियंटची एंट्री झाली आहे. देशात आता पर्यंत या नवीन व्हेरियंटचे 250 रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्रात या Omicron sub-variant KP.2 चे 91 प्रकरणे समोर आली आहे.   15 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार,  पुण्यात 51, ठाण्यात 20, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येकी 07 प्रकरणे KP.2 व्हेरियंटची नोंदवली गेली.

follow us

वेब स्टोरीज