Download App

CR Kesavan Join BJP : तीन दिवसात काँग्रेसला तीन धक्के! पहिल्या भारतीय गव्हर्नर जनरलचा पणतू भाजपात

  • Written By: Last Updated:

CR Kesavan Join BJP : काँग्रेसचे माजी नेते आणि देशाचे पहिले भारतीय गव्हर्नर-जनरल सी राजगोपालाचारी यांचे पणतू सीआर केसवन यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. महत्त्वाचे म्हणजे, सीआर केशवन यांनी फेब्रुवारीमध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता.2047 पर्यंत भारत विश्वगुरू होईल त्याच दिशेने मी काम करेन. रामसेतू बनवण्यात गिलहरीने जे योगदान दिले तेवढेच माझे योगदान असेल असेही केसवन यांनी यावेळी सांगितले.  केशवन यांनी व्हीके सिंग, अनिल बलुनी आणि प्रेम शुक्ला यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. सीआर केसवन यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, या आधी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी (A. K. Antony) यांचा मुलगा अनिल अँटनी (Anil Antony) यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर काल आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे दोन धक्के सहन होत नाही तोच आता काँग्रेसचे माजी नेते आणि देशाचे पहिले भारतीय गव्हर्नर-जनरल सी राजगोपालाचारी यांचे पणतू सीआर केसवन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात काँग्रेसला तीन धक्के बसले आहेत. आगामी काळात होणाऱ्या लोकसभेपूर्वी काँग्रेसमधील दिग्गज नेत भाजपात प्रवेश करत असल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का असलल्याचे चित्र आहे. पंतप्रधान मोदींच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत आपल्याला योगदान द्यायचे आहे, त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे रेड्डी यांनी पक्ष प्रवेशावेळी स्पष्ट केले होते.

पक्षावर गंभीर आरोप

राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीआर केसवन म्हणाले की, पक्ष सोडल्यानंतर मी काँग्रेसवर भाष्य करावे असे मला वाटत नाही. काँग्रेसमध्ये सुरू असलेले राजकारण मला पटले नाही. अशा स्थितीत पक्ष सोडणे योग्य होते, तेच मी आज केले.माझी राजकारणाची पद्धत पक्षाच्या पद्धतीसारखी नाही हे मला जाणवले, त्यामुळे मी भारत जोडो यात्रेतही सहभागी झालो नाही. 

Tags

follow us