मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला; नागरिकांची माहिती चोरण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला (Cyber Attack) झाल्याचे वृत्त समोर आले असून, हल्लेखोरांकडून नागरिकांची खासगी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सायबर हल्ल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. (Cyber Attack On Supreme Court Web Site) Supreme Court issues a circular stating that its Registry has been made aware of […]

Supreme Court

Supreme Court

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला (Cyber Attack) झाल्याचे वृत्त समोर आले असून, हल्लेखोरांकडून नागरिकांची खासगी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सायबर हल्ल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. (Cyber Attack On Supreme Court Web Site)

सुप्रीम कोर्टाने जारी केलेल्या निवेदनात रजिस्ट्रीच्या वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्याचे नमुद केले आहे. अधिकृत वेबसाईटप्रमाणे दिसणारी एक वेबसाईट तयार करण्यात आली असून, याच्याद्वारे नागरिकांची खासगी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सायबर हल्ल्यानंतर नागरिकांनी त्यांची कोणतीही वैयक्तिक माहिती अपलोड न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य टांगणीला; निवडणुकीबाबतची सुनावणी पुढे ढकलली

सुप्रीम कोर्टाची जी अधिकृत वेबसाईट आहे ती WWW. spi.gov.in अशी आहे. मात्र, सायबर चोरट्यांनी spi.gv.com अशा युआरएलने फेक वेबसाईट बनवण्यात आली आहे. यावर क्लिक केल्यास लोकांची खासगी आणि गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न सायबर चोरट्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिककृत वेबसाईटशिवाय कोणत्याही फेक वेबसाईटला बळी पडू नये तसेच तुमचा डेटा चोरीला गेला असेल, तर त्याबाबत तातडीने सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Toordal Price Hike : ऐन सणासुदीत डाळी महागल्या 100 रुपयांची तूरडाळ 170 रुपयांवर

सध्या सुप्रीम कोर्टाची अनेक कामे ही ऑनलाईन होत असून, त्यात अशाप्रकारे सायबर हल्ला झाल्याचे वृत्त धक्कादायक मानले जात आहे. आता या सायबर हल्ल्यानंतर नेमकी कशाप्रकारे कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version